जेसलमेर : सर्वोच्च न्यायालयाने भलेही तिहेरी तलाक घटनाबाह्य ठरवला असेल, पण या बेकायदा प्रथेचा अद्यापही देशात वापर सुरू आहे. अलीकडेच उत्तर प्रदेशातील एका मुस्लीम पुरुषाने राजस्थानात पोखरणजवळील मांगलोई गावी माहेरी असलेल्या पत्नीला थेट स्पीड पोस्टानेच तिहेरी तलाक कळवला.मोहम्मद अर्शद याने स्पीड पोस्टने पाठवलेले तिहेरी तलाकचे पत्र त्याची कुलसुम हिला बकरी ईदच्या दिवशीच हातात पडले. ते पत्र पूर्णपणे उर्दूतून लिहिले होते आणि अशिक्षित कुलसुमला ते अब्दुल अझिझ नावाच्या गावकºयाकडून ते वाचून घ्यावे लागले.माहम्मद अर्शद आणि कुलसुम यांचा विवाह अडीच वर्षांपूर्वी झाला होता. सुरुवातीला सारे नीट चालले होते. पण नंतर मोहम्मदने पत्नीला उद्देशून ‘तू दिसायला सुंदर नाहीस, मला तू त्यामुळे आवडत नाहीस,’ असे सांगायला सुरुवात केली.पुढे त्याने पत्नीला मारहाण सुरू केली त्यामुळे कुलसुमचे वडील छोटू खान यांनी अनेकदा मध्यस्थी केली. पण त्यातून काही साध्य झाले नाही. अखेर १४ आॅगस्ट रोजी मोहम्मद अर्शदने तिला पाठवून तिला तलाक दिला. (वृत्तसंस्था)कायदेशीर कारवाई सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक बेकायदा ठरविला असल्याने कुलसुमने मोहम्मद अर्शदविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यात नवरा त्रास देत असे आणि पैशाची मागणी करीत असे, याचा उल्लेख तिने केला आहे. तिहेरी तलाकचा सुरुवातीला तक्रारीत उल्लेख नव्हता. पण तोही करण्यात येणार आहे.
स्पीड पोस्टने पाठवून दिला तलाक, पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 1:40 AM