ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २२ - योग संशोधन कार्यासाठी पतांजली आयुर्वेद लिमिटेड दहा हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचे योगगुरू रामदेव बाबा यांनी बुधवारी जाहीर केले आहे.योग संशोधन कार्यासाठी आम्ही आधीच मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत आहोत, परंतु येत्या काळात सुद्धा यासाठी दहा हजार कोटी रुपये खर्च करणार आहोत, असे आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत योगगुरू रामदेव बाबा यांनी सांगितले. योगा म्हणजे मोठे जग आहे. आम्ही सुरुवातीला एक लाख योगाचे शिक्षक तयार करणार आहोत. योगाचा फायदा जवळपास एक कोटी लोकांना झाला आहे, असेही यावेळी रामदेव बाबा म्हणाले. तसेच समाजात जास्त करून अनेक लोकांना मानसिक ताणतणाव असल्याने वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे फक्त योगाच त्या आजारांना दूर करू शकतो, असे ऑल वर्ल्ड गायत्री परिवाराचे प्रमुख प्रणव पांड्या यांनी सांगितले.