सोनिया, प्रियांका, राहुल गांधी यांना परदेशातही एसपीजी संरक्षण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 05:25 AM2019-10-08T05:25:58+5:302019-10-08T05:30:02+5:30

देशात सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी यांना सध्या एसपीजी सुरक्षा दिली जात आहे.

SPG protection for Sonia, Priyanka and Rahul Gandhi abroad? | सोनिया, प्रियांका, राहुल गांधी यांना परदेशातही एसपीजी संरक्षण?

सोनिया, प्रियांका, राहुल गांधी यांना परदेशातही एसपीजी संरक्षण?

googlenewsNext

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : ज्या नेत्यांना देशामध्ये एसपीजीचे (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) संरक्षण आहे, त्यांना विदेशातही हीच सुरक्षा व्यवस्था पुरविण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या कंबोडियाच्या दौऱ्यावर गेले असतानाच सरकार असा विचार करीत असल्याची माहिती मिळत आहे.
देशात सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी यांना सध्या एसपीजी सुरक्षा दिली जात आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर या तिघांनाही ही सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. याआधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही हत्या करण्यात आली होती.
काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले आहे की, सत्तारुढ पक्ष व सरकारने प्रत्येक व्यक्तीचे खासगीपण जपले पाहिजे. कुणाच्याही खासगी आयुष्यात कसलीही ढवळाढवळ होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. राहुल गांधी रविवारी रात्री विमानाने बँकॉकला रवाना झाले. तेथून ते आपल्या मित्राला भेटण्यासाठी कंबोडियाला गेले आहेत. येत्या तीन ते चार दिवसांत राहुल गांधी भारतात परत येतील. महाराष्ट्र, हरयाणामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात ते प्रचारसभाही घेणार आहेत.

Web Title: SPG protection for Sonia, Priyanka and Rahul Gandhi abroad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.