माकड हे माणसाचे पूर्वज आहे, असे म्हटले जाते. कर्नाटकातील ज्योती राज या तरुणाच्या कसरती पाहून तर त्याला दुजोरा मिळू शकतो. कुठलाही आधार न घेता मोठे डोंगर आणि दगडी भागावर ज्योती राज एखाद्या माकडासारखे चढतात. ते जिणू खरेखुरे स्पायडर मॅन आहेत. मंकी मॅन म्हणूनही त्यांची ओळख आहे. अगदी भिंतीवरुन चालणेही त्यांच्या हातचा मळ आहे. भिंतीवर उलटे चालून त्यांनी आपल्या कौशल्याचे एक वेगळे उदाहरण दाखवून दिले आहे. ज्योति सांगतात की, आयुष्यात निराश होऊन एकदा मी एका उंच दगडापर्यंत पोहचलो आणि तेथून उडी मारण्याचे ठरविले. पण, त्यांना हे समजलेच नाही की एवढ्या उंचीवर आपण आलोच कसे? ज्योती यांचे हे टॅलेंट एखाद्या अॅक्शन हीरोपेक्षा नक्कीच उजवे आहे. माकड भलेही आमचे पूर्वज असतील, पण ज्योति यांचा प्रवास उलटा आहे. ते माणूस ते माकड असा उलटा प्रवास करत आहेत. यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. फ्रॅक्चरमुळे शरीरात चार रॉड टाकण्यात आले आहेत. यते म्हणतात की, हाडे तुटली असली, तरी माझा आत्मविश्यास कधीच तुटू देणार नाही.
कुठलाही आधार न घेता डोंगर चढणारे रीअल लाइफमधील स्पायडर मॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 1:14 AM