उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एक बाळ अत्यंत दुर्मिळ आजाराशी लढाई लढत आहे. अवघ्या 11 महिन्यांच्या वयात त्याला आजार झाला आहे, ज्यामध्ये स्नायू कमकुवत होण्यासोबतच श्वास घेणं कठीण होत आहे. आयकर विभागातील टॅक्स असिस्टेंट अमित यांचा 11 महिन्यांचा मुलगा कणव हा स्पायनल मस्कुलर ऍट्रोफी 1 (SMA 1) या गंभीर आजाराने त्रस्त आहे. मुलाच्या उपचारासाठी 17.50 कोटी रुपयांच्या इंजेक्शनची गरज आहे, त्यासाठी पालक निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहेत.
कणवचे वडील अमित यांनी आपल्या काळजाच्या तुकड्याचा जीव वाचवण्यासाठी देशासमोर हात पसरले आहेत. 17 कोटींचा डोंगर उभा करणे सामान्य माणसाला जवळपास अशक्य आहे. मुलाचे पालक पैसे कुठून आणणार या चिंतेत दिवसरात्र घालवत आहेत. अमित यांना आशा आहे की केवळ नोएडाच नाही तर इतर शहरातील लोकही त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी मदतीसाठी नक्कीच पुढे येतील. मुलाच्या कुटुंबाची असहायता पाहून राजकारण्यांनीही सोशल मीडियावर भावनिक आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनीही लोकांना मदतीचे आवाहन केले आहे.
अमित यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे कुटुंब नजफगडमध्ये राहते. काही दिवसांपूर्वी गंगाराम रुग्णालयात मुलाचा आजाराबाबत समजलं. त्यानंतर एम्समध्येही तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये या आजाराची पुष्टी झाली. सध्या मुलावर फिजिओथेरपी सुरू आहे. त्याचवेळी सहकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन अमित यांच्या मुलाच्या उपचारासाठी शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
हा एक दुर्मिळ आजार आहे. याचा त्रास झाल्यास मुलाचे स्नायू कमकुवत होतात. शरीरात पाणी कमी असते. श्वास घेण्यासही त्रास होतो. मुलाचे शरीर मुलाचे शरीर पूर्णपणे निष्क्रिय होऊ लागते. या आजारामुळे मुलांच्या पाठीच्या कण्यातील चेतापेशींचे नुकसान होते. आम आदमी पक्षानेही सर्वसामान्यांना क्राउडफंडिंगचे आवाहन केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"