विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच झारखंडमध्ये सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षामध्ये मोठी फूड पडण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते चंपई सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आज चंपई सोरेन यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्या भावी राजकीय वाटचालीबाबतचा अंदाज येत आहे. मी राजकारणातून निवृत्ती स्वीकारणार नाही, तर नव्या पक्षाची स्थापना करणार आहे. तसेच आपल्या आघाडी करण्यासाठी सर्व पक्षांसाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत, असेही चंपई सोरेन यांनी सांगितले आहे.
आपल्या निर्णयाबाबात माहिती देताना झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन म्हणाले की, मी राजकारणातून निवृत्ती स्वीकारणार नाही. मी तीन पर्याय सांगितले होते. निवृत्ती, संघटना किंवा मित्र. आता मी निवृत्ती स्वीकारणार नाही. मी पक्षाला भक्कम बनवेन, नव्या पक्षाची स्थापना करेन. तसेच वाटेत कुणी चांगला मित्र भेटला तर त्याच्यासोबत पुढे जाईन.
माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी दिल्लीहून परतल्यांतर समर्थकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, चंपई सोरेन हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र मात्र हे दावे त्यांनी फेटाळून लावले आहेत. दरम्यान, समर्थकांशी विचारविनिमय केल्यानंतर चंपई सोरेन यांनी आपला वेगळा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पुढच्या सात दिवसांच्या आत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले आहे.