नवी दिल्ली - दिल्ली विधानसभेनं 2019 वर्षीच विधानसभेच्या सत्रामध्ये स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचे विधेयक पारीत केलं होत. कोरोना महामारी अन् लॉकडाऊनमुळे हे काम मागे पडले होत. मात्र, आता लवकरच स्पोर्ट्स विद्यापीठ उभारले जाणार असून दिल्लीकरांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीच्या पहिल्या कुलगुरू म्हणून ऑलिम्पिक विजेत्या महिला खेळाडूला बहुमान देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिल्लीतील स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं म्हटलं आहे. दिल्ली स्पोर्ट युनिव्हर्सिटी सुरू होत आहे, आमचं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण झालंय. मला हे सांगताना अभिमान वाटतोय की, ऑलिम्पिक पदक विजेत्या कर्णम मल्लेश्वरी या युनिव्हर्सिटीच्या पहिल्या कुलगुरू होणार आहेत. आज त्यांच्यासमवेत भेट झाली अन् विस्तृत स्वरुपात चर्चा झाली, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.
कोण आहेत कर्णम मल्लेश्वरी
कर्णम मल्लेश्वरी या वेटलिफ्टींग खेळी संबंधित असून ऑलिंपिकपदक विजेता आहेत. ऑलिंपिक पदत जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू म्हणून त्यांचा गौरव आहे. मल्लेश्वरी यांनी सन 2000 साली सिडनी ऑलिंपिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते. आजही त्यांचा विक्रम कायम आहे. कारण, अद्याप एकाही भारतीय महिला वेटलिफ्टरने त्यांच्या विक्रमाला गवसणी घातली नाही.