सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रदूषण मुक्तीच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या गेल्या आणि पर्वणीच्या काळात दक्षिण गंगा मानली जाणारी गोदावरी स्वच्छ राहिली असली तरी आता पुन्हा या नदीला ओंगळ स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. दसर्याला गोदावरीवर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी झालेले घट विसर्जन आणि नदीपात्रात टाकलेले निर्माल्य यामुळे नदी अतिशय प्रदूषित झाली असून, पात्रात सर्वत्र फुले आणि प्लास्टिकच्या पिशव्या तरंगताना दिसून येत आहेत.
ऑन द स्पॉट- गंगा पुन्हा मैली
By admin | Published: October 24, 2015 1:39 AM