जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. सार्वजनिक सुरक्षा अधिनियम (पीएसए) अंतर्गत मुफ्ती यांच्या नजरकैदत 5 मे पासून तीन महिन्यांसाठी वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर, 'नव्या इंडिया'त मुस्लिमांना 'खलनायक' ठरवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कलम 370 लागू झाल्यापासून मेहबुबा मुफ्ती नजरकैदेत आहेत. त्यांचं ट्विटर अकाऊंट मुलगी इल्तिजा मुफ्ती ही चालवते. आज त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही टीका करण्यात आली आहे.''नवीन इंडियात मुस्लीम भीतीच्या वातावरणात जगत आहेत आणि त्यांच्यावर सतत टीका होत आहे. कोरोनाचा प्रसार होण्यापासून ते हत्तीणीला मारण्यापर्यंत, प्रत्येक समस्येला मुस्लिमांना जबाबदार ठरवलं जात आहे. या नव्या वर्णभेदी व्यवस्थेत मुस्लिमांना खलनायक ठरवलं जात आहे,''असं ट्विट मुफ्ती यांच्या अकाऊंटवरून शुक्रवारी करण्यात आलं आहे.
कोरोना रुग्णाच्या प्रसाराला तबलिगी जमातीला जबाबदार धरले गेले आणि त्यात काही दिवसांपूर्वी केरळ येथे झालेल्या गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूलाही मुस्लीम समाजाल टार्गेट केले जात असल्याचा दावा मुफ्ती यांच्या ट्विटवरून केला जात आहे. मुफ्ती यांना सुरुवातीला श्रीनगर येथील हरी निवास गेस्ट हाऊस येथे ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना चष्मा शाही येथील टुअरिस्ट डिपार्टमेंट येथे हलवण्यात आले. त्याविरोधात PDPच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करण्यात आली होती. 7 एप्रिलनंतर त्यांना पुन्हा त्यांच्या गुपकर रोड येथील निवासस्थानी शिफ्ट करण्यात आले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कोट्यधीश नेयमारचा अवघ्या ९ हजारांच्या सरकारी निधीसाठी अर्ज?... जाणून घ्या सत्य
आपला गडी मागे राहिला; विराट कोहलीला 'या' हॉट मॉडल्सनी टाकलं पिछाडीवर!
Viral Video : 7 वर्षांच्या मुलीचा ‘Helicopter shot’ पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
लॉकडाऊनमध्ये घरबसल्या विराट कोहलीनं कमावले कोट्यवधी; जाणून घ्या कसे!
वसीम अक्रमच्या महान फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरला शेवटचं स्थान!
चला निसर्ग जगवूया, मनाची बंद कवाडं उघडूया; रोहित शर्माची भावनिक साद
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सर्वोत्तम वन डे संघातून रोहित शर्माला वगळले!