शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मराठवाड्यात पावसाचा शिडकावा

By admin | Published: September 05, 2015 12:36 AM

विदर्भात तुरळक : कोकण, मध्य महाराष्ट्र कोरडाच

विदर्भात तुरळक : कोकण, मध्य महाराष्ट्र कोरडाच
पुणे : यंदा मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवलेली आहे, मात्र गेल्या २४ तासांत मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. त्याचप्रमाणे विदर्भातही पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. विदर्भातील लोणार येथे सर्वाधिक ५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. मात्र मध्य महाराष्ट्रात अद्यापही पावसाची ओढ लागली आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात जोरदार पावसााची शक्यता नसल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे.
मराठवाड्यात आतापर्यंत तुरळक पाऊस पडला आहे. मात्र मागील २४ तासांत पावसाने मराठवाड्यातील भोकरदन, देगलूर, जाफराबाद, परतूर, सिल्लोड, वसमत येथे प्रत्येकी २० मिमी तर अहमदपूर, जालना, किनवट, मुखेड, फुलंब्री, पूर्णा, सोएगाव येथे प्रत्येकी १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
दोन दिवसांपासून विदर्भातून गायब झालेला पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. विदर्भात लोणार येथे ५० मिमी तर जळगाव जामोद, मेहकर प्रत्येकी ३० मिमी,बुलढाणा, देऊळगाव राजा, खामगाव, मुलचेरा, नांदुरा, राजुरा, संग्रामपूर येथे प्रत्येकी २० मिमी तर चिखली, मोताळा, रिसोड, सिंदखेडराजा, तेल्हारा या ठिकाणी १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडला नाही.
येत्या २४ तासांत राज्यात मराठवाड्यातील बर्‍याच ठिकाणी, कोकण, विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल तसेच पुणे व पुण्याच्या आसपासच्या परिसरात तुरळक सरी पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.