शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
2
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
3
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
4
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
5
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
6
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
7
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
8
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
9
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
10
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
11
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
12
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
13
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
14
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
15
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
16
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
17
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
18
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
19
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
20
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण

सपाच्या यादीने काँग्रेसच्या 'हाताला' थरथर!

By admin | Published: January 20, 2017 4:07 PM

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षात आघाडी झाली असतानाच शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अचानक

ऑनालाइन लोकमत
लखनौ, दि. 20 -   उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षात आघाडी होऊन दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत असतानाच शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अचानक सपाच्या 191 उमेदवारांची यादी जाहीर केल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे. सपाने परस्पर उमेदवारांची यादी जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून,  दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन उमेदवारांची यादी जाहीर करायची होती. पण सपाकडून आधीच उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. हे कमी म्हणून की काय ज्या मतदार संघांची मागणी काँग्रेसने  केली होती, तेथेही सपकडून उमेदवार जाहीर करण्यात आल्याने दोन्ही पक्षांमधील आघाडीबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, आघाडीबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज बब्बर सपाच्या नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. 
गौतमबुद्धनगर मधील तीन जागा तसेच नोएडा, दादरी आणि जेवर येथून सपाने आपले उमेदवार घोषित केले आहेत. परंतु यापैकी किमान एक जागा तरी आपणास मिळावी, अशी काँग्रेसची अपेक्षा होती. याबाबत अखिलेश यांचे निकटवर्तीय किरणमय नंदा यांनी अमेठी बरोबरच लखनऊ कँट मतदारसंघ सुद्धा सपा आपल्याकडे ठेवेल, असे स्पष्ट केले आहे. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस आणि सपा आघाडीमध्ये अर्धा डझन मतदारसंघातील उमेदवारीवरून मतभेद आहेत. सपा आपले मंत्री  गायत्री प्रजापती यांच्यासाठी काँग्रेसचा अमेठी मतदार संघ घेण्यास इच्छुक आहे, तर त्याबदल्यात काँग्रेसला गौरीगंज मतदार संघ सोडण्याची तयारी सपाने दर्शवली आहे. मात्र या अदलाबदलीत काँग्रेस राय बरेली, बछरांवा, तिलोई, हरचंदपूर आणि उंचाहार मतदारसंघ मागत आहे. पण सपा कोणत्याही परिस्थितीती सरेनी आणि उंचाहार मतदारसंघ सोडण्यास तयार नाही आहे. सध्यस्थितीत सपा काँग्रेससाठी 80 जागा सोडण्यास तयार आहे, तर किमान 100 जागा मिळाव्यात अशी काँग्रेसची इच्छा आहे. पण तेवढ्या जागा देऊन आपली पारंपरिक ताकद कमी करण्याची सपाची इच्छा नाही. असे केल्यास आपले पारंपरिक मुस्लिम मतदार काँग्रेसकडे वळतील अशी भीती सपाला वाटत आहे.