लखनौ - रामजन्मभूमी खटल्याचा सर्वोच्च न्यायलयात निकाल लागून अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर परवा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम जन्मभूमीवर राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. दरम्यान, अनेक वर्षांपासून राजकीय अजेंड्यावर असलेला राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावल्याने उत्तर प्रदेशातभाजपाने राजकीय आघाडी घेतली आहे. आता भाजपाच्या रामाला प्रत्युत्तर देण्यासाठी इतर राजकीय पक्षांकडूनही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील ब्राह्मण वर्गाच्या व्होट बँकेचा विचार करून भाजपाच्या रामाला परशुरामाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याची तयारी समाजवादी पक्षाने केली आहे.ब्राह्मण मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशमधील सर्वच राजकीय पक्ष करत आहेत. त्यात उत्तर प्रदेशात ब्राह्मणांसाठी सर्वात जास्त काम हे समाजवादी पक्षानेच केले आहे, असा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. तसेच उत्तर प्रदेशात ब्राह्मणांचा सन्मान वाढवण्यासाठी भगवान परशुरामाचा भव्य मूर्ती उभारण्याची घोषणा पक्षातर्फे करण्यात आली आहे. या मूर्तीची उंची १०८ फूट असेल तसेच तिची स्थापना उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये उभारण्यात येईल.मूर्ती उभारण्याच्या तयारीस समाजवादी पक्षाकडून सुरुवात झाली आहे. तसेच त्यासाठी सपाचे नेते जयपूर येथे पोहोचले आहेत. परशुरामा चेतना ट्रस्टच्याअंतर्गत ही मूर्ती स्थापन केली जाईल.मूर्ती उभारण्यासाठी देशातील नामांकित मूर्तीकार अर्जुन प्रजापती आणि अटल बिहारी वाजपेयींची प्रतिमा निर्माण करणाऱ्या राजकुमाप यांच्याशी चर्चा सुरू आहे. प्रतिमा स्थापित करण्यासाठी समाजवादी पक्षाच्यावतीने देणग्यांच्या माध्यमातून निधी गोळा केला जाणार आहे.गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात ब्राह्मण व्होटबँकेच्या राजकारणाने जोर पकडला आहे. विकास दुबेचे एन्काऊंटर आणि नंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून ब्राह्मण नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेस या मुद्द्यावर आक्रमक आहे. तसेच राज्यातील प्रत्येक घटनेचा संदर्भ हा ब्राह्मणांशी जोडला जात आहे. तसेच समाजवादी पक्षानेदेखील आपल्या दिग्गज ब्राह्मण नेत्यांकडे या राजकारणाची धुरा सोपवली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी