चंदिगड - पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने तब्बल 86 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबच्या तीन जिल्ह्यांत विषारी दारू पिऊन गेल्या दोन दिवसांत दगावलेल्या लोकांची संख्या आता 86 च्या वर गेली आहे. याप्रकरणी 25 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 13 अधिकाऱ्यांसह दोन पोलिस ठाण्यांचे प्रभारी आणि एका डीएसपीला निलंबित करण्यात आले आहे. तसेच 100 पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारीही केली आहे
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. दारुबंदी विभागातील सात व दोन उपअधीक्षक आणि चार ठाणेप्रमुखांसह पोलीस दलातील सहा, अशा एकूण 13 अधिकाऱ्यांना निलंबित करून याप्रकरणी दंडाधिकारीय चौकशी जाहीर केली. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मृताच्या कुटुंबास दोन लाख रुपयांच्या मदतीची ही घोषणा केली आहे. पंजाब पोलिसांनी या प्रकरणात आणखी 17 लोकांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची संख्या 25 झाली आहे.
तरणतारण जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 63 तर अमृतसर (ग्रामीण) व गुरदासपूरमध्ये (बटाला) अनुक्रमे 12 व 11 लोकांचा विषारी दारुमुळे मृत्यू झाला आहे. "पोलीस आणि दारुबंदी विभागाच्या हलगर्जीपणामुळे झालेले हे मृत्यू ही राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. लोकांना अशा प्रकारे विष पाजून कोणीही सुटू शकणार नाही. पंजाबच्या प्रत्येक नागरिकाचा जीव बहुमूल्य असून काही मूठभर लोकांच्या हव्यासाने असे हकनाक बळी जाऊ दिले जाणार नाहीत. जो कोणी दोषी असतील, अशा कोणाचीही खैर केली जाणार नाही" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मोदी सरकारचा चीनला आणखी एक दणका; कलर TV आयात करण्यास बंदी
TikTok चे अच्छे दिन संपले? लवकरच होणार व्हिडिओ शेअरिंग अॅपचा लिलाव
काय सांगता? ...म्हणून 50 वर्षांपासून 'या' गावात बहिणीने भावाला बांधली नाही राखी
Sushant Singh Rajput Suicide : "रिया म्हणजे 'विषकन्या', सुशांतच्या मृत्यूला 'गँग' जबाबदार"
खरंच की काय? हजार, बाराशे नाही तर शेतकऱ्याला आलं तब्बल 64 लाख विजेचं बिल