Squadron Leader Mohana Singh, LCA Tejas fighter fleet: भारताची लेक स्क्वाड्रन लीडर मोहना सिंग हिने एक मोठी झेप घेतली. मोहना सिंग भारताच्या स्वदेशी LCA तेजस फायटर जेट फ्लीटचे संचालन करणाऱ्या एलिट 18 'फ्लाइंग बुलेट्स' स्क्वाड्रनमध्ये सामील होणारी पहिली महिला लढाऊ पायलट बनली. संपूर्ण देशातील विविध विभागातील पहिल्या टप्प्यातील महिला फायटर पायलट्स मध्येही तिचा समावेश आहे. तिची उल्लेखनीय कामगिरी देशातील प्रत्येक मुलीला या क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा देईल अशी अपेक्षा तिने उड्डाणानंतर व्यक्त केली. मोहनाची ही कामगिरी तिची महिला सक्षमीकरण आणि भारतीय हवाई दलासाठी असलेली वचनबद्धता दर्शवते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
देशातील पहिली महिला लढाऊ वैमानिक
अधिकारी मोहना सिंग ही नुकतीच 'मेड इन इंडिया' अंतर्गत जोधपूर येथे आयोजित 'तरंग शक्ती' या सरावाचा एक भाग होती, जिथे ती तिन्ही सेवांच्या तीन उपप्रमुखांच्या ऐतिहासिक उड्डाणाचा एक भाग होती. स्क्वॉड्रन लीडर मोहना सिंग भारतीय वायुसेनेमध्ये लढाऊ वैमानिक बनलेल्या तीन महिलांच्या पहिल्या गटाचा भाग आहे. तिच्याव्यतिरिक्त, स्क्वाड्रन लीडर भावना कंठ आणि स्क्वाड्रन लीडर अवनी चतुर्वेदी यांचा या गटात समावेश होता. त्या सध्या पश्चिम वाळवंटात Su-30 MKI लढाऊ विमानांचे संचालन करत आहेत.
देशातील महिला फायटर पायलट्समध्ये हळूहळू वाढ
मोहना ही आतापर्यंत मिग-२१ चे संचालन करत होती. अलीकडेच पाकिस्तान सीमेवर गुजरात सेक्टरमधील नलिया हवाई तळावर तैनात असलेल्या एलसीए स्क्वॉड्रनमध्ये ती तैनात होती. ऐतिहासिक उड्डाणा दरम्यान, स्क्वॉड्रन लीडर मोहना LCA तेजस फायटर जेटमधील फ्लाइटवर लष्कर आणि नौदलाच्या उपप्रमुखांना सूचना देताना आणि त्यांना तयारीसाठी मदत करताना दिसली. २०१६ मध्ये सरकारने महिलांसाठी फायटर स्ट्रीम उघडल्यापासून आता IAF मध्ये सुमारे 20 महिला फायटर पायलट आहेत.