ऑनलाइन लोकमत
कोची, दि. १९ : केरळ विधानसभा निवडणूकीमध्ये माजी क्रिकेटर एस. श्रीशांत याचा पराभव झाला आहे. दक्षिण भारतात कमळ फुलविण्यासाठी श्रीशांत भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढत होता. या पराभवासोबतच निवडणुकीच्या मैदानात श्रीशांत आऊट झाला आहे. एस श्रीशांत हा केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्याचा आहे. श्रीशांत तिरुअनंतपुरम मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर लढत होता. राज्याचे विद्यमान आरोग्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते व्ही एस शिवकुमार यांनी त्याचा पराभव केला आहे.
काँग्रेसचे नेते व्ही एस शिवकुमार यांनी श्रीशांतचा ११,७१० मतांनी पराभव केला आहे. काँग्रेसच्या व्ही एस शिवकुमार यांना ४६,४७४ मतं मिळाली आहेत. श्रीशांतला ३४,७६४ मतं मिळाली आहेत. या मतदारसंघात श्रीशांत तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. दुस-या क्रमांकावर अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट अँथोनी राजू असून त्यांना ३५,५६९ मतं मिळाली आहेत.
पराभवानंतर श्रीशांतने ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. श्रीशांतने म्हटले आहे की, ज्यांनी ज्यांनी माझ्यावर प्रेम केले, मला मदत केली त्या सर्वांचे आभार, मी जनतेसाठी यापुढेही काम करत राहाणार.
Thanks to all the supporters for all the love and respect..will surly keep working for the people..— Sreesanth (@sreesanth36) May 19, 2016