ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - सीमारेषेपलीकडचा दहशतवाद हा मुख्य मुद्दा असून सार्क देशांनी यावर चर्चा करणं गरजेचं असल्याचं श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे बोलले आहेत. उरी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईला समर्थन देत रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तणाव कमी करण्यासाठी गरज असलेली सर्व पावलं उचलली आहेत असं सांगत कौतुक केलं. तसंच युद्द हा पर्याय नसल्याचंही रानिल विक्रमसिंघे बोलले आहेत.
चीनसोबत आमचे व्यवहारिक संबंध असून कोणतेही लष्करी संबंध नसल्याचं रानिल विक्रमसिंघे यांनी यावेळी स्पष्ट केलं. याअगोदर नेपाळनेही सार्क देशांनी आपल्या भुमीचा उपयोग दहशतवादासाठी करु नये असं आवाहन केलं होतं. भारत आणि इतर देशांनी सार्कमध्ये सहभागी न होण्याची भुमिका घेतल्यानंतर इस्लमाबादमधील आयोजित सार्क परिषद रद्द करण्यात आली होती.
Cross border terrorism is a big issue(in SAARC) and we have to discuss how to tackle it: Srilankan PM Ranil Wickramasinghe pic.twitter.com/5rzdUrP8S2— ANI (@ANI_news) October 5, 2016
जर्मनीनेही भारताच्या कारवाईला पाठिंबा दर्शवला असून ' आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे कोणत्याही देशाला दहशतवादापासून स्वत:ला वाचवण्याचा हक्क आहे', असं जर्मनीचे भारतातील राजदूत डॉ. मार्टिन ने यांनी सांगितलं आहे.
As per Int'l law, any state has the right to defend its territory from terrorism: Dr. Martin Ney,German Ambassador to India #SurgicalStrikepic.twitter.com/5asXivMmuy— ANI (@ANI_news) October 5, 2016
Don't think war (India-Pak) is an option, your PM (PM Modi) has taken a lot of steps to defuse tensions: Srilankan PM Ranil Wickramasinghe pic.twitter.com/u6yiBQPCsI— ANI (@ANI_news) October 5, 2016