ऑनलाइन लोकमत
रामेश्वरम, दि. 21 - सीमा ओलांडून आपल्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप करत श्रीलंकेच्या नौदलाने 10 भारतीय मच्छीमारांना कटचथिऊ येथे मंगळवारी अटक केली.
रामनाथपुरम येथील लहान बेट असणाऱ्या कटचथिऊजवळील समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौदलाने पकडले. त्यांच्याकडील बोट सुद्धा जप्त केली आहे. संबंधित मच्छीमार तामीळनाडूमधील थानगचिमदाम येथील रहिवासी आहेत. सीमा ओलांडून आपल्या हद्दीत मासेमारी केल्याचा आरोप करत श्रीलंकेच्या नौदलाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीलंकेच्या नौदलाकडून एका भारतीय मच्छीमाराला कथितरित्या ठार करण्यावरून थानगचिमदाम येथे शेकडो मच्छीमारांनी निदर्शने केली होती. या घटनेमुळे तणाव निर्माण झाल्यानंतर भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांनी एकमेकांच्या तुरुंगातील मच्छीमारांची सुटका करण्याचा सामंजस्य करार केला. त्यानुसार श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या अनेक भारतीय मच्छीमारांची सुटका करण्यात आली होती.