शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

श्रीलंकेतील कारागृहात दंगल, 8 कैदी ठार तर 37 जण जखमी; पळून जाण्याचा कट उधळला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2020 4:28 AM

कारागृहातील दोन अधिकारी जखमी

कोलंबो : श्रीलंकेची राजधानी कोलंबो शहरानजीक महारा या विभागातील कारागृहामध्ये रविवारी झालेल्या भीषण दंगलीत आठ कैदी ठार, तर ३७ जण जखमी झाले.. कोरोना साथीच्या भीतीने काही कैद्यांनी या कारागृहातून पळून जाण्याचा केलेला प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.

या कैद्यांनी कारागृहाचे मुख्य प्रवेशद्वार उघडण्यासाठी पोलिसांना वेठीस धरले. मात्र त्यांचे हे प्रयत्न पोलिसांनी अयशस्वी ठरविले. त्यावेळी कैद्यांनी केलेल्या दंगलीत आठ कैदी ठार तर ३७ जण गंभीर जखमी झाले. या कैद्यांना आवरण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. जखमी झालेल्यांमध्ये कारागृहातील दोन अधिकाºयांचाही समावेश आहे. या घटनेतील सर्व जखमींवर रागामा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. श्रीलंकेत १० हजार कैदी मावतील अशा कारागृहांमध्ये सध्या २६ हजारांहून अधिक कैदी ठेवण्यात आले आहेत. 

कोरोनाने कैद्यांत भीतीकोरोना संसर्गामुळे सध्या कैदी घाबरले असून आम्हाला गर्दी नसलेल्या तुरुंगात हलवावे अशी मागणी त्यांनी कारागृह अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र ती मान्य न झाल्याने कैदी संतप्त झाले होते. या कारागृहांमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून श्रीलंकेतील तुरुंगांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला कारण कैदी आणि तुरूंगरक्षक कोरोनाबाधित असल्याचे अहवाल येत होते तुरुंगांशी संबंधित असे एक हजारपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण समोर आले होते. गेल्या आठवड्यात एक कैदी मारला गेला तर गेल्या मार्चमध्ये एका कैद्याचा मृत्यू झाला. आम्ही खात्रीने सांगू शकत नाहीत पण बरेचसे मृत्यू व कैदी जखमी झालेत ते बंदुकीच्या गोळ्यांमुळे, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी अजिथ रोहाना यांनी म्हटले.