शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

"पूल वेळीच बांधला असता तर ही बोट दुर्घटना झाली नसती"; मृतांच्या नातेवाईकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 6:04 PM

झेलम नदीत बोट उलटून सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे.

श्रीनगरमधील झेलम नदीत बोट उलटून सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. लाल चौकापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर झेलम नदीच्या काठावर गंडबल गाव वसले आहे. मृतांमध्ये 45 वर्षीय फैयाज मलिक यांची जुळी मुलं आणि पत्नी फिरदौसा यांचा समावेश आहे. मुदसीर आणि तनवीर अशी मुलांची नावं होती. पूल वेळीच बांधला असता तर ही दुर्घटना घडली नसती असं म्हणत मृतांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. 

19 लोक बोटीने झेलम नदी पार करत होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे बोट उलटली. बोट उलटल्यानंतर एका पुलावर आदळली आणि बुडाली. अपघातानंतर चार जणांना वाचवण्यात यश आले. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले. बचाव पथकाने आणखी 15 लोकांना पाण्यातून बाहेर काढले. याच दरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. 

नदीत अजूनही काही लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस आणि लष्कराचे बचाव पथक उपस्थित आहे. जनतेचा रोष प्रशासन आणि नेत्यांवर आहे. संतापाचे कारण म्हणजे गेल्या वर्षभरापासून या परिसरात बांधकाम सुरू असलेला पूल आहे. हा एक फूटब्रिज असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे काम 2013 मध्ये सुरू झाले आणि 2016 पर्यंत संथ गतीने सुरू राहिले. आता पुलाचे काम अचानक बंद झाले. लाल चौकाजवळ बोटीतून मुलं व पालकांची ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बोट केबलने जोडलेली होती. ओढल्यावर बोट एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊ लागली. सपोर्ट केबल तुटल्याने बोट उलटली. बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या पिलरला धडकल्याने बोटीचा अपघात झाला. हा पूल वेळीच बांधला असता तर ही दुर्घटना घडली नसती असं नागरिकांनी म्हटलं आहे. 

तीन महिन्यांत लाल चौकाला स्मार्ट सिटी बनवलं. जगाला दाखवण्यासाठी लाखो किमतीचे दिवे आणि टाइल्स लावल्या. काश्मीर जगासाठी स्वर्ग आहे पण आपल्यासाठी ते नरक आहे असं स्थानिक तरुणाने म्हटलं आहे. अपघाताच्या वेळी बोटीत नेमके किती लोक होते हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. श्रीनगरचे आयुक्त बिलाल मोहिउद्दीन यांनी सांगितले की, बोट दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरdrowningपाण्यात बुडणेriverनदी