श्रीनगर : श्रीनगरमध्ये या हिवाळ्यातील सगळ्यात कडाक्याची थंड रात्र म्हणून रविवारी उणे ४.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. उर्वरीत काश्मीर खो-यात तापमान शून्याच्याही खाली गेले होते. लडाख विभागातील लेह येथे रविवारी रात्री तापमान किमान तापमान ८.० अंश सेल्सियस होते. कारगिल गावाजवळ उणे ७.१ अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले, असे हवामान खात्याने म्हटले.त्याआधी या हिवाळ्यातील किमान तापमान उणे ३.८ अंश सेल्सियस पाच डिसेंबर रोजी नोंद झाले होते. सोमवारी सकाळी श्रीनगर शहरात व खो-यातील इतर भागात दाट धुके पसरले होते व दृश्यमानता ३०० मीटरपेक्षाही कमी झाली होती. उर्वरीत काश्मीर खोºयात थंडीच्या लाटेची परिस्थिती सगळ््या हवामान नोंदणी केंद्रांत गोठणबिंदुच्याही खाली कित्येक अंश तापमान नोंद झाल्यामुळे कायम आहे. अधिकाºयाने सांगितले की दक्षिण काश्मीरमधील काझीगुंड येथे तापमान उणे ३.६ अंश सेल्सियस नोंद झाले. ते शनिवारी रात्री उणे २.२ अंश सेल्सियस एवढे होते. (वृत्तसंस्था)>येत्या ४८ तासांत थंड, कोरडे हवामान अपेक्षित असल्यामुळे तापमान जम्मू आणि काश्मीरमध्ये आणखी खाली येण्याची शक्यता आहे. कोकेरनाग गावात रविवारी उणे १.८ अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले होते ते सोमवारी २.९ अंश सेल्सियस नोंदले गेले.
श्रीनगरमध्ये तापमान उणे ४.२ अंश सेल्सिअस, पारा आणखी उतरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 3:56 AM