सुीसाठी एसटी, बस सज्ज
By admin | Published: April 13, 2015 11:53 PM
नांदेड : उन्हाळी सुीनिमित्त एसटीसह खासगी ट्रॅव्हल्स, रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे़ प्रवाशांना सोयीचे व्हावे, यासाठी एसटी आगार आणि खासगी बसगाड्याचालकही सज्ज झाले आहेत़ प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या परीक्षा संपताच दुसर्या दिपसापासूनची आरक्षणे फुल झाली आहेत़ एप्रिल, मे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विविध भागातील प्रवाशांसाठी जादा गाड्यांचे नियोजन केले आहे़ गाड्यांमध्ये कोणत्याही तांत्रिक दोष राहणार नाही, प्रवाशांना अडचणी निर्माण होवू नयेत याची काळजी महामंडळाकडून घेतली जात आहे़
नांदेड : उन्हाळी सुीनिमित्त एसटीसह खासगी ट्रॅव्हल्स, रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे़ प्रवाशांना सोयीचे व्हावे, यासाठी एसटी आगार आणि खासगी बसगाड्याचालकही सज्ज झाले आहेत़ प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या परीक्षा संपताच दुसर्या दिपसापासूनची आरक्षणे फुल झाली आहेत़ एप्रिल, मे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विविध भागातील प्रवाशांसाठी जादा गाड्यांचे नियोजन केले आहे़ गाड्यांमध्ये कोणत्याही तांत्रिक दोष राहणार नाही, प्रवाशांना अडचणी निर्माण होवू नयेत याची काळजी महामंडळाकडून घेतली जात आहे़ खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनीही उन्हाळी सुट्यांचे नियोजन केले आहे़ घसरण भरून काढण्यासाठी तिकिट दरवाढ केली आहे़ ट्रॅव्हल्सची बुकिंग जोरात सुरू आहे़ पुणे, नागपूर, कोल्हापूर, यवतमाळ आदी ठिकाणी जाणार्या प्रवाशांचे प्रमाण जास्त आहे़ स्लीपर कोच गाड्यांमध्ये वाढ होत आहे़ नामांकित कंपन्यांच्या गाड्यांना जास्त मागणी आहे़ काही नागरिकांचे सुीचे पद्धतशीर नियोजन नसते अथवा सुटी कधी भेटणार याची कल्पना नसते़ एसटी व रेल्वेचे आरक्षण फुल झाल्याने ऐनवेळी खासगी ट्रॅव्हल्सने जावे लागते़ ज्या मार्गावर जाण्यासाठी जास्त गर्दी असते़ त्या गाड्यांचे दर दुपटीने वाढविले जातात़ गावाकडे जाण्यासाठी मिळेल ते वाहन पकडण्याची मानसिकता प्रवाशांची असते़ याचाच फायदा घेवून खासगी ट्रॅव्हल्सवाले येणारे प्रवासी आपल्याकडे वळवतात़ ट्रॅव्हल्ससाठी कोणत्याच प्रकारचे भाड्याचे बंधन नाही़ त्यामुळे जितके जास्त पैसे घेता येतील तितके ते प्रवाशांकडून घेतात़ ट्रॅव्हल्सच्या सुटण्याच्या वेळाही निश्चित नसतात़ ते अनेकदा नागरिकांना तासन् तास थांबवून ठेवतात़ त्यामुळे नागरिकांचे हाल होतात़ शहरातील तरोडा नाका, राज कॉर्नर, सांगवी, वर्कशॉप, शिवाजीनगर, कलामंदिर, भाग्यनगर, आनंदनगर, हिंगोली नाका, हिंगोली गेट, जुना मोंढा, कौठा, लातूरफाटा आदी भागातून ट्रॅव्हल्स जातात़ हिंगोली गेट येथून सर्वाधिक ट्रॅव्हल्स उभ्या असतात़ येथूनच राज्यातील अनेक मोठ्या शहराच्या ठिकाणी गाड्या जातात़ रेल्वे आरक्षण केंद्रावर तत्काळसाठी रांगारेल्वेने प्रवास करणार्यांची संख्या शहरात जास्त आहे़ पुर्वी रेल्वेचे आरक्षण ६० दिवस आधी खुले केले जात होते़ त्यात बदल करून १२० दिवस आधी खुले करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे़ १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे़ एप्रिल, मे महिन्याची बुकींग पुर्ण झाली आहे़ यामुळे तत्काळमध्ये तिकिट काढण्यासाठी आरक्षण केंद्रावर गर्दी होत आहे़