नाशिक : महापालिकेने शहरात पावसाळी गटार योजना राबविली असली तरी दिवसभरात झालेल्या विक्रमी पावसामुळे संपूर्ण शहरात पाणी साचले होते. याशिवाय सोसायट्या आणि बंगल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरून नुकसान झाले होते. विशेष म्हणजे महापालिकेकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार आहे.शहरात महापालिकेने यापूर्वीच पावसाळी गटार योजना राबविली आहे. त्यामुळे काही भागात पाणी साचणार नसल्याचे सांगण्यात येत असले तरी वेळोवेळी पाणी साचते. मंगळवारी तर विक्रमी पाऊस झाल्याचे निमित्त घडले आणि सर्वच रस्ते जलमय झाले होते. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. शिवाय शहराच्या अनेक भागात सोसायट्या आणि घरे तसेच बंगल्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. २००८ मध्ये महापालिकेने पूरपरिस्थितीत नागरिकांना मदत म्हणून साचलेले पाणी उपसा करण्याची सोय करून दिली होती, मात्र यंदा अशी कोणतीही सोय नव्हती. याशिवाय गंगापूररोडवर वाढत्या पुराविषयी नागरिकांना पुरेशी कल्पनाच दिली जात नसल्याने नागरिक माध्यमांच्या कार्यालयात दूरध्वनी करून विचारणा करीत होते. अनेक नागरिकांना मध्यरात्रीपर्यंत पाण्याचा उपसा करावा लागला तर गंगापूररोडसह अनेक भागातील नागरिकांना अन्यत्र आपल्या नातेवाइकांकडे राहण्यासाठी जावे लागले.
घराघरांमध्ये साचले पाणी नागरिक बेहाल : पालिकेकडून पुरेशी मदत मिळालीच नाही
By admin | Published: August 02, 2016 11:28 PM