स्टेडियम क्रिकेट क्लबला विजेतेपद
By admin | Published: May 28, 2015 11:58 PM
स्टेडियम क्रिकेट क्लबला विजेतेपद
स्टेडियम क्रिकेट क्लबला विजेतेपद टी-२० क्रिकेट स्पर्धा : पुणे : अनिकेत कुंभार (४०), आदित्य परदेशी (२६ व ३/२२), विनायक बोजा (२/१५), मयुरेश रजपूत (२/१) यांच्या खेळामुळे स्टेडियम क्रिकेट क्लब संघाने गायकवाड क्रिकेट ॲकॅडमीचा ४९ धावांनी पराभव करून १९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत स्टेडियम करंडक जिंकला. लॉ कॉलेजच्या मैदानावर झालेल्या या अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना स्टेडियम क्लबने निर्धारित २० षटकांत ९ बाद १४८ धावांपर्यंत मजल मारली. त्यांच्या अनिकेत कुंभारने ३० चेंडूंत ४० धावा केल्या, तर आदित्य परदेशीने २६ धावांची भर घातली. १४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गायकवाड क्लबचा डाव १९.१ षटकांत सर्व बाद ९९ धावांत संपुष्टात आला. त्यांच्या अनिकेत पाटील (१७) आणि आकाश सत्कार (१६) यांनी ३२ धावांची सलामी देऊन चांगली सुरुवात केली. यानंतर प्रतीक पोखर्णीकरने (३०) एकाकी लढत दिली. स्टेडियम क्लबच्या आदित्यने २२ धावांत ३, विनायक बोजाने १५ धावांत २ व मयुरेश रजपूतने एका धावेत २ बळी घेतले. गायकवाड क्लबचा प्रतीक पोखर्णीकर सर्वोत्कृष्ट फलंदाज, स्टेडियम क्लबचा आदित्य परदेशी सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. स्टेडियम क्लबचा अनिकेत कुंभारला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून म्हणून गौरविण्यात आले.संक्षिप्त धावफलक : स्टेडियम क्रिकेट क्लब : २० षटकांत ९ बाद १४८ (अनिकेत कुंभार ४०, आदित्य परदेशी २६, शुभम दोशी १३, प्रतीक पोखर्णीकर ४-२३, ओंकार राऊत २-२१) वि. वि. गायकवाड क्रिकेट क्लब : १९.१ षटकांत सर्व बाद ९९ (प्रतीक पोखर्णीकर ३०, अनिकेत पाटील १७, आकाश सत्कार १६, आदित्य परदेशी ३-२२, विनायक बोजा २-१५, मयूरेश राजपूत २-१). (क्रीडा प्रतिनिधी) =============================