लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी २० मेरोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आठ राज्यांतील ४९ मतदारसंघांत एकूण ६९५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी १५९ (२३ टक्के) उमेदवारांवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत, तर २२७ (३३ टक्के) उमेदवार कोट्यधीश आहेत. तसेच सर्व उमेदवारांकडे सरासरी ३.५६ कोटींची संपत्ती असल्याचे असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) व नॅशनल इलेक्शन वॉचच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तसेच या केवळ ८२ महिला उमेदवार रिंगणात असून त्यांचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. महिलांचे कमी प्रमाण या टप्प्यातही दिसत आहे.
उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी
साधारण गुन्हे १५९ गंभीर गुन्हे १२२ महिलांविषयक गुन्हे २९ खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे २८ द्वेषपूर्वक विधान केल्याचे गुन्हे १० खुनाशी संबंधित गुन्हे ४शिक्षा मिळालेले ३
पक्षनिहाय गुन्हेगार उमेदवारपक्ष गुन्हे गंभीर गुन्हेसपा ५ ४शिंदेसेना ३ २एमआयएम २ २भाजप १९ १२ काँग्रेस ८ ७तृणमूल ३ २उद्धवसेना ३ १राजद १ १बीजेडी १ ०
सर्वाधिक संपत्ती असलेले टॉप ३ उमेदवार
नाव मतदारसंघ (राज्य) पक्ष चल संपत्ती अचल संपत्ती एकूण संपत्तीअनुराग शर्मा झांशी (उत्तर प्रदेश) भाजप ९५.२७ कोटी ११६.८० कोटी २१२.०७ कोटीनीलेश सांबरे भिवंडी (महाराष्ट्र) अपक्ष ३२.७२ कोटी ८३.३७ कोटी ११६.०९ कोटीपीयूष गोयल मुंबई उत्तर (महाराष्ट्र) भाजप ८९.८६ कोटी २१.०८ कोटी ११०.९५ कोटीसर्वात कमी संपत्ती असलेले टॉप ३ उमेदवारमो. सुलतान गनी बारामुल्ला (ज-का) अपक्ष ६७ रुपये ० रुपये ६७ रुपयेमुकेश कुमार मुझफ्फरपूर (बिहार) अपक्ष ७०० रुपये ० रुपये ७०० रुपयेसुरजित हेम्बराम हुगळी (प. बंगाल) अपक्ष ५,४२७ रुपये ० रुपये ५,४२७ रुपये
उमेदवारांचे शिक्षण तरी किती?
अशिक्षित ५शिक्षित २० ५वी पास २१ ८वी पास ६४ १०वी पास ९७ १२वी पास १११ डिप्लोमा २६ पदवीधर १४९ पदव्युत्तर पदवी १२७ पीएच.डी. ९