लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत होणार आहे. कोणत्या टप्प्यात किती मतदारसंघांत मतदान होत आहे आणि त्यात पक्ष लढवत असलेल्या जागा यावरून प्रचाराला किती वेळ मिळेल, याचे गणित मांडले जात आहे.
६३ मतदारसंघांत प्रचाराला वेळ कमी
- भाजप: भाजपचे खासदार असलेल्या ३०० मतदारसंघांपैकी १९७ मतदारसंघात गेल्या वेळी सारख्याच टप्प्यांत मतदान होणार आहे. ४० मतदारसंघांमध्ये टप्प्यांत वाढ झाल्याने प्रचार आणि नियोजनासाठी अधिक वेळ मिळेल. तथापि, ६३ मतदारसंघांमध्ये टप्प्यात कपात केल्याने प्रचारासाठी कमी वेळ मिळणार आहे.
- काँग्रेस : काँग्रेसचे खासदार असलेल्या ५१ मतदारसंघांपैकी २१ मतदारसंघात गेल्या वेळी सारख्याच टप्प्यांत मतदान होणार आहे. ४ मतदारसंघांमध्ये टप्प्यांत वाढ झाल्याने प्रचार आणि नियोजनासाठी अधिक वेळ मिळेल. तथापि, २६ मतदारसंघांमध्ये टप्प्यांत कपात केल्याने प्रचारासाठी कमी वेळ मिळेल.
- द्रमुक : द्रमुकचे खासदार असलेल्या सर्व २४ मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी कमी वेळ मिळणार आहे. तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात मतदान होत आहे. यावेळी नाडूत निवडणूक एक टप्पा आधी होणार आहे.
- तृणमूल काँग्रेस : तृणमूल काँग्रेसचे खासदार असलेल्या २४ मतदारसंघांत मागील वेळेप्रमाणेच तेवढ्याच टप्प्यांत मतदान होणार आहे. पश्चिम बंगालवरून निवडणूक आयोगात वाद निर्माण झाला होता.
- वायएसआर काँग्रेस : आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेसचे खासदार असलेल्या सर्व २२ जागांवर एकाच चौथ्या टप्प्यात मतदान होईल. त्यामुळे वायएसआर काँग्रेसला प्रचाराला अधिक वेळ मिळेल.
- शिवसेना : महाराष्ट्रात १९ पैकी १० मतदारसंघात मागील वेळेप्रमाणेच मतदान होणार आहे. एक टप्पा वाढल्याने शिवसेनेला प्रचारासाठी आणखी वेळ मिळाला आहे.
- जदयू : बिहारमध्ये जदयूकडे असलेल्या सर्व १६ मतदारसंघांमध्ये जुन्या टप्प्यांप्रमाणेच मागील वेळेप्रमाणेच निवडणुका होतील.
राजकीय पक्षांत टप्पानिहाय मतदारसंघांची संख्या
राजकीय पक्ष मतदारसंघ एकूण टप्पे टप्पा १ टप्पा २ टप्पा ३ टप्पा ४ टप्पा ५ टप्पा ६ टप्पा ७
- भाजप ३०० ७ ४० ५१ ७१ ४१ ३२ ४१ २४
- काँग्रेस ५१ ६ १४ १८ ४ ६ १ ० ८
- द्रमुक २४ १ २४ ० ० ० ० ० ०
- तृणमूल काँग्रेस २३ ५ ० ० २ ५ ४ ३ ९
- वायएसआर काँग्रेस २२ १ ० ० ० २२ ० ० ०
- शिवसेना १९ ५ १ ४ ५ २ ७ ० ०
- जनता दल युनायडेट १६ ७ १ ४ ३ १ १ ३ ३
- बिजू जनता दल १२ ४ ० ० ० २ २ ४ ४
- बहुजन समाज पार्टी १० ४ ३ १ ० ० ० ४ २
- तेलंगणा राष्ट्र समिती ९ १ ० ० ० ९ ० ० ०
- लोकजनशक्ती पार्टी ६ ५ २ ० १ १ १ १ ०
- राष्ट्रवादी काँग्रेस ५ ३ १ ० ३ १ ० ० ०
- माकप ३ २ २ १ ० ० ० ० ०
- अपक्ष ३ २ ० २ १ ० ० ० ०
- इंडियन युनियन मुस्लीम लीग ३ २ १ २ ० ० ० ० ०
- नॅशनल कॉन्फरन्स ३ ३ ० ० १ १ १ ० ०
- समाजवादी पार्टी ३ २ १ ० २ ० ० ० ०
- तुलगू देसम ३ १ ० ० ० ३ ० ० ०
- एआयएमआयएम २ १ ० ० ० २ ० ० ०
- अपना दल (सोनेवाल) २ १ ० ० ० ० ० ० २
- भाकप २ १ २ ० ० ० ० ० ०
- शिरोमणी अकाली दल २ १ ० ० ० ० ० ० २
- आम आदमी पार्टी १ १ ० ० ० ० ० ० १
- एजेएसयू पार्टी १ १ ० ० ० ० ० १ ०
- एआयएडीएमके १ १ १ ० ० ० ० ० ०
- एआययूडीएफ १ १ ० ० १ ० ० ० ०
- जनता दल (धर्मनिरपेक्ष) १ १ ० १ ० ० ० ० ०
- झारखंड मुक्ती मोर्चा १ १ ० ० ० ० ० ० १
- केरळ काँग्रेस (एम) १ १ ० १ ० ० ० ० ०
- मिझो नॅशनल फ्रंट १ १ १ ० ० ० ० ० ०
- नागा पीपल्स फ्रंट १ १ १ ० ० ० ० ० ०
- नॅशनल पीपल्स पार्टी १ १ १ ० ० ० ० ० ०
- एनडीपीपी १ १ १ ० ० ० ० ० ०
- राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी १ १ १ ० ० ० ० ० ०
- रिव्होलोशनरी सोशलिस्ट पार्टी १ १ ० १ ० ० ० ० ०
- शिरोमणी अकाली दल (अमृतसर) १ १ ० ० ० ० ० ० १
- सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा १ १ १ ० ० ० ० ० ०
- व्हीसीके पार्टी १ १ १ ० ० ० ० ० ०
- ### ४ २ २ २ ० ० ० ० ०
- एकूण ५४३ ----- १०२ ८८ ९४ ९६ ४९ ५७ ५७