शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

टोकन घेण्यासाठी एकाच वेळी आले ४ हजार लोक; तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 07:53 IST

तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी दरम्यान सहा भाविकांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जखमी झाले आहेत.

Tirupati Balaji Temple Stampede :आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे वैकुंठ द्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जण ठार तर अनेक जण जखमी झाले. ४००० हून अधिक भाविक उपस्थितीत असताना ही चेंगराचेंगरी झाली. वैकुंठ एकादशीचे टोकन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक एक दिवस आधीपासून रांगेत उभे राहिले होते. मात्र प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा बळी गेला. या घटनेनंतरही हजारो भाविक टोकन घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील वैकुंठ द्वार दर्शन तिकीट काउंटरजवळ बुधवारी रात्री साडेनऊ वाजता चेंगराचेंगरी झाली. या अपघातात एका महिलेसह 6 जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुईया सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तिकिटांसाठी ९१ काउंटर उघडण्यात आले  होते. काउंटरजवळ चार हजारांहून अधिक भाविक रांगेत उभे होते. त्यांना बैरागी पट्टिडा पार्कमध्ये रांगेत उभे राहण्यास सांगण्यात आले होते. टोकन मिळवण्याच्या नादात गोंधळ उडाला आणि लोक पळताना एकमेकांच्या अंगावरुन धावून गेले. या घटनेत मल्लिका नावाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. 

१० ते १९ जानेवारी या कालावधीत वैकुंठ एकादशीला वैकुंठद्वार दर्शनासाठी उघडण्यात येणार आहे. पहाटे ४.३० वाजल्यापासून दर्शन सुरू होईल. त्यानंतर सकाळी ८ वाजल्यापासून सर्व दर्शन सुरू होईल. त्यासाठी टोकन घेण्यासाठी लोक रांगेत उभे होते. या १० दिवसांत सुमारे ७ लाख भाविक येण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये गोंधळादरम्यान लोक एकमेकांना ढकलत असताना दिसत आहेत. तर पोलिस अधिकारी गर्दीचे व्यवस्थापन करताना दिसत आहेत. इतर व्हिडिओंमध्ये चेंगराचेंगरी झाल्यानंतर जखमी भाविकांवर पोलीस सीपीआर देताना दिसत आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काउंटरवर टोकन घेताना सुमारे ६० लोक एकमेकांवर पडले. प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. काही भाविकांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी या घटनेमागे कोणताही कट असल्याचा नकार दिला आहे. हा अपघात असल्याचे त्यांनी सांगितले.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून फोनवरून परिस्थितीची माहिती घेतली आणि घटनास्थळी जाऊन मदतकार्य करण्याचे आदेश दिले, जेणेकरून जखमींना चांगले उपचार मिळू शकतील. ते गुरुवारी तिरुपतीला जाऊन जखमींची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटAccidentअपघात