ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि.15 - पश्चिम बंगालच्या गंगासागर येथील यात्रेत चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये 6 श्रद्धाळूंचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. जखमींचा नेमका आकडा अजून समजू शकलेला नाही. जखमींमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार बंकिम हाजरा यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर बचावाकार्यासाठी पथकं तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
चेंगराचेंगरीची माहिती मिळाल्यानंतर एनडीआरएफ आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले असून मदत कार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने गंगासागर यात्रेत श्रद्धाळू गंगास्नानसाठी पोहोचतात. गंगासागरला कुंभ मेळ्यानंतर देशातील सर्वात मोठा मेळा मानला जातो. श्रद्धाळू कोचुबेरिया घाट येथून एका बोटीत जाण्याचा प्रयत्न करत असताना चेंगराचेंगरीची घटना घडल्याचं प्राथमिक वृत्त आहे.
PM approved ex-gratia from PMNRF, of Rs 2 lakh for next of kin of those deceased & Rs. 50,000 for those injured in the stampede in WB.— PMO India (@PMOIndia) 15 January 2017
My prayers with those injured in the stampede in West Bengal. May they recover quickly: PM @narendramodi— PMO India (@PMOIndia) 15 January 2017
Gangasagar fair stampede: 6 died, 10 hospitalised— ANI (@ANI_news) 15 January 2017