कर्नाटकमधील हासनमध्ये एका मंदिरात विजेचा धक्का लागल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. चेंगराचेंगरीत 20 जण जखमी झाले आहेत. यापैकी 10 जणांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हसनांबे मंदिरात ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हसनांबे मंदिरात शुक्रवारी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. मंदिरात दर्शनासाठी भाविक रांगेत उभे होते. याच दरम्यान, अचानक विजेचा धक्का बसला. यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 20 हून अधिक लोकं जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. अनेकांना यामध्ये किरकोळ दुखापत झाली आहे.
हे मंदिर वर्षातून एकदाच उघडते आणि दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक मोठे नेतेही हसनांबे येथे दर्शनासाठी येत असतात.
10 जण रुग्णालयात दाखल
या घटनेत जखमी झालेल्या सुमारे 10 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पंख्यामध्ये शॉर्टसर्किट झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे, त्यानंतर अचानक विजेचा धक्का लागला आणि मंदिरात एकच गोंधळ उडाला.