हैदराबाद : आंध्र प्रदेशातील तिरुमाला व्यंकटेश्वरा (तिरुपती बालाजी) मंदिरात आज भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे आतापर्यंत तीन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्वदर्शनम तिकीट (Sarvadarsanam ticket) काढण्यासाठी भाविक आले होते, त्यामुळे तिकीट काउंटरवर मोठी गर्दी झाली होती.
आज तिरुपतीमधील तिन्ही तिकीट काउंटरवर प्रचंड गर्दी होती. चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आम्ही भाविकांना विना तिकीट दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. सध्या परिस्थिती सामान्य असून भाविक आरामात देवाचे दर्शन घेत आहेत, असे तिरुमला तिरुपती देवस्थानमचे (TTD) पीआरओ रवी कुमार यांनी सांगितले.
वेळेत होतो बदलतिरुमाला व्यंकटेश्वर मंदिरातील सर्वदर्शनम तिकीट सुविधेद्वारे सर्वांना मोफत दर्शन मिळते. मात्र, यामध्ये नंबर येण्यास बराच वेळ लागतो. मोफत सुविधेमुळे येथे अनेकदा मोठी रांग लागते. आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी सर्वदर्शनमच्या वेळेत बदल होतो. इतर मंदिरांतील दर्शनाच्या पद्धतींपेक्षा यामध्ये नंबर येण्यास जास्त वेळ लागतो.