देशाच्या आत्म्यावरचा हल्ला, सर्व विरोधक केंद्रासोबत - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 12:34 PM2019-02-15T12:34:04+5:302019-02-15T13:04:08+5:30
Pulwama Terror Attack : पुलवामामध्ये (Pulwama Terror Attack) गुरुवारी (14 फेब्रुवारी) सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा काँग्रेसने पक्षाने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली - पुलवामामध्ये (Pulwama Terror Attack) गुरुवारी (14 फेब्रुवारी) सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा काँग्रेसने पक्षाने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी (15 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेस पक्ष शहीद जवानांचे कुटुंबीय, सुरक्षा दल आणि सरकारसोबत असल्याचे यावेळेस राहुल गांधींनी सांगितले. देशाच्या आत्म्यावर हल्ला झाला असून, ही वेळ राजकारण करण्याची नाहीय. आम्ही सर्व विरोधी पक्ष केंद्र सरकारसोबत आहोत, असेही त्यांनी म्हटले.
राहुल गांधी पुढे असंही म्हणाले की, ''दहशतवाद हा देशाचे विभाजन करण्याचा आणि देश तोडण्याचा प्रयत्न करतो. पण या देशाला तोडण्याचा प्रयत्न कोणतीही शक्ती करू शकत नाही. ज्या लोकांनी हा भ्याड हल्ला केला आहे, ते या देशाला किंचितसाही त्रास देऊ शकत नाहीत. या प्रकरणी हल्लेखोरांना केंद्र सरकार जी काही शिक्षा देण्याचा निर्णय घेईल, आम्ही त्यांच्यासोबत आहोत''.
पत्रकार परिषदेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाददेखील उपस्थित होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला. ते म्हणाले की, 'आम्ही शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. दहशतवादाविरोधात आपल्याला कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. दहशतवाद्यांविरोधातील कारवाईमध्ये आम्ही देशासोबत आहोत'.
Former Prime Minister Manmohan Singh: Today is the day of mourning. Our country has lost close to 40 armed forces jawans and our foremost duty is to convey to their families that we are with them. We shall never compromise with the terrorist forces. #PulwamaAttackpic.twitter.com/vPnKXNTIFl
— ANI (@ANI) February 15, 2019
Congress President Rahul Gandhi: This is a time of mourning, sadness, & respect. We are fully supporting the govt of India and our security forces. We are not going to get into any other conversation apart from this. #PulwamaAttackpic.twitter.com/Dkfn5yh3KH
— ANI (@ANI) February 15, 2019
Congress President Rahul Gandhi: This is a terrible tragedy. This type of violence done against our soldiers is absolutely disgusting. We are all standing together with our jawans. No force can divide or break this country. #PulwamaAttackpic.twitter.com/p3up6d9AnQ
— ANI (@ANI) February 15, 2019
#PulwamaTerrorAttack: पाकिस्तानने घोडचूक केली, कठोर शिक्षा भोगावी लागेल; नरेंद्र मोदींनी खडसावले https://t.co/1tumRxCyEI #PulwamaAttack@narendramodi
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 15, 2019
'दहशतवाद्यांनी घोडचूक केलीय, आता किंमत मोजावी लागेल'- नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा (Pulawama Terror Attack) तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत पाकिस्तानला कठोर इशारा दिला आहे. ''पुलवामाच्या हल्लेखोरांनी मोठी चूक केली आहे आणि याची किंमत त्यांना चुकवावीच लागेल. यासाठी भारतीय सैन्य दलाला संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले आहे'', अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला खडसावले.
पंतप्रधान मोदी असंही म्हणाले की, ''दहशतवादाविरोधातील कारवाई आणखी वेगवान करणार असून दहशतवादी संघटना आणि त्यांना पोसणाऱ्यांना या हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. शेजारील देशांचे कुटील मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नाही. भ्याड हल्ल्यांना भारत चोख प्रत्युत्तर देईल''.
''जागतिक स्तरावर एकट्या पडलेल्या शेजारील देशाला वाटत असेल की, अशा प्रकारच्या षड़यंत्रांमुळे भारतात अस्थिरता निर्माण होईल, तर तसे कदापि शक्य होणार नाही. 130 कोटी देशवासीय अशा प्रकारच्या कटकारस्थानांविरोधात आणि भ्याड हल्ल्यांविरोधात सडेतोड प्रत्युत्तर देतील.'', असेही मोदींनी ठणकावून सांगितले आहे. दरम्यान, आपला देश एकजूट आहे, फक्त राजकारण करू नका, असं आवाहनही यावेळेस पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना केले आहे.
दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याची गंभीर दखल घेऊन पाकिस्तानवर राजनैतिक पातळीवर बहिष्कार टाकण्याची ठाम भूमिका केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं घेतली आहे. पाकिस्तानला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्याच्या दिशेनंही पावलं उचलली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज झाली. पुलवामा दहशतवादी हल्ला घडवणाऱ्यांना आणि त्यासाठी मदत करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असा निर्धारच या बैठकीत करण्यात आला.
इनफ इन इनफ; आता युद्धच हवं; गौतम गंभीरसह भारतीय खेळाडूंची भावनाhttps://t.co/VtWO6t1LKP#Pulwama#PulwanaAttack#CRPFJawans#PulawamaTerrorAttack#BadlaKab
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 15, 2019
भ्याड हल्ल्यात 44 जवान शहीद
पुलवामा येथे (Pulwama Terror Attack) झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. गुरुवारी (14 फेब्रुवारी) जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. ज्या ताफ्यावर हा हल्ला झाला, त्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या.
तालिबानी स्टाईलचा हल्ला
वाहनांमध्ये स्फोटके भरून ती एखाद्या गर्दीच्या ठिकाणी घुसवायची आणि आत्मघाती हल्ला घडवून आणायचा ही तालिबानी अतिरेक्यांची स्टाइल आहे. असा हल्ला आतापर्यंत भारतात, काश्मीरमध्ये कधीही झाला नव्हता. जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अब्दुल रशीद गाझी याने या हल्ल्यासाठी आयईडी स्फोटांचे ट्रेनिंग दिले होते. तो तालिबानी संघटनेत कार्यरत होता. त्यानेच हा हल्ला तालिबानी स्टाइलने घडविल्याचे म्हणणे आहे. तालिबानी संघटना पाकमध्ये सैनिकांवर अशाच प्रकारे हल्ला करतात. तीच पद्धत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने गुरुवारच्या हल्ल्यात वापरली. 192 काश्मिरी तरूण गेल्या वर्षभरात दहशतवादी संघटनांमध्ये गेले आहेत.
स्थानिक तरूणांनी दहशतवादाकडे वळणे ही लष्कराच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. चकमकीत स्थानिक दहशतवाद्यांना मारल्याची काश्मीर खोऱ्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
काय होता गुप्तचरांचा अॅलर्ट?
या हल्ल्याच्या पूर्वी भारताच्या गुप्तचर संस्थांनी अॅलर्ट जारी केला होता. त्यात म्हटले होते की, संसदेवरील ह्ल्ल्याप्रकरणी ज्या दिवशी (९ फेब्रुवारी) अफजल गुरूला फासावर लटकवण्यात आले त्याच दिवशी हल्ला करायचा कट, अतिरेक्यांनी रचला आहे. हल्ल्यावेळी आयईडी स्फोट घडविले जाऊ शकतात. सर्व सुरक्षा संस्थांनी अॅलर्ट राहावे.