नवी दिल्ली: मला हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि नेतृत्त्व निवडीची प्रक्रिया सुरू करा, अशा सूचना सोनिया गांधींनी पक्षाच्या कार्यकारणीली केल्या आहेत. यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांना अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्याचं आवाहन केलं. काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही बैठक व्हर्च्युअल होत आहे. या बैठकीत सोनिया यांनी त्यांना अंतरिम अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याच्या भूमिका मांडली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारावीत, अशी विनंती सोनिया यांनी केली. देशातल्या काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष मिळावा, अशी मागणी केली. या पत्रातून अप्रत्यक्षपणे नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. या पत्रावर मनमोहन सिंग आणि ए. के. अँटनी यांनी कार्यकारणी समितीच्या बैठकीत जोरदार टीका केली आहे.
सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय?देशभरातील काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी २३ नेत्यांनी पत्रातून केली. यामध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या अनेक सदस्यांसह, पाच माजी मुख्यमंत्री, खासदार आणि माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. पक्ष जनाधार आणि तरुणांचा विश्वास गमावत आहे. पक्षाला प्रभावी नेतृत्त्वाची गरज आहे. तो केवळ काम करताना दिसू नये, तर त्याचं काम प्रत्यक्ष जमिनीवर दिसायला हवं. सीडब्ल्यूसीची निवडणूक व्हायला हवी आणि पक्षाला पुन्हा उभारी घ्यावी यासाठी ठोस योजना तयार करायला हवी, असं २३ नेत्यांनी पत्रात म्हटलं आहे.काँग्रेस नेत्यांनी मांडल्या अडचणी-१. राज्य काँग्रेसचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तांमध्ये नाहक विलंब.२. सन्मान आणि स्वीकारार्ह असलेल्या नेत्यांच्या प्रदेश काँग्रेसवर नियुक्त्या होत नाहीत.३. राज्य प्रमुखांना संघटनेशी संबंधित निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही.४. युथ काँग्रेस आणि एनएसयूआयमधील निवडणुकांमुळे संतुलन बिघडलं.
काँग्रेस नेत्यांच्या मागण्या काय?१. नेतृत्वात स्थायी आणि प्रभावी बदल व्हावेत.२. काँग्रेस कार्यकारी समितीच्या निवडणूक व्हाव्यात३. पक्षानं गमावलेली ताकद परत मिळवण्यासाठी योजना गरजेची४. संघटनेतील प्रत्येक स्तरावर निवडणूक व्हावी५. संसदीय पार्टी बोर्डाची स्थापना व्हावी.६. प्रदेश काँग्रेसला ताकद दिली जावी.