नवी दिल्ली : खोऱ्यातील शाळा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न करा, असे केंद्राने मेहबूबा मुफ्ती सरकारला सांगितले आहे. हिंसाचारामुळे खोऱ्यातील शाळा ११० दिवसांपासून बंद आहेत. समाजकंटकांनी अलीकडे खोऱ्यात अनेक शाळा जाळल्या. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पावले उचलावीत, असे निर्देशही दिले. राज्यात शाळा जाळण्याच्या घडत असलेल्या घटनांबद्दल, तसेच राज्यातील गोंधळाचा फटका बसलेल्या मुलांच्या भवितव्याबाबत केंद्र सरकार चिंतित आहे. गेल्या काही दिवसांत खोऱ्यात विविध ठिकाणी किमान २६ शाळा जाळण्यात आल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
काश्मीरमधील शाळा सुरू करा
By admin | Published: November 02, 2016 4:26 AM