नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १ मे रोजी दारिद्र्यरेषेखाली (बीपीएल) जीवन जगणाऱ्या पाच कोटी कुटुंबांना स्वयंपाकाचे मोफत गॅस कनेक्शन (एलपीजी) उपलब्ध करून देणाऱ्या ८,००० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ करणार आहेत. १ कोटी १३ लाख ग्राहकांनी एलपीजी सबसिडीचा त्याग केल्यामुळे झालेल्या बचतीचा उपयोग या योजनेसाठी करण्यात येणार आहे.मोदी हे १ मे रोजी उत्तर प्रदेशच्या बलिया येथे या ‘उज्ज्वला’ योजनेचा शुभारंभ करतील. एलपीजी सबसिडी सोडण्याचे श्रीमंतांना आवाहन करून मोदींनी गेल्या वर्षी २७ मार्च रोजी या ‘गिव्ह इट अप’ योजनेची औपचारिक सुरुवात केली होती. परंतु ही योजना जानेवारी २०१५ मध्येच सुरू झाली होती. ‘या मोहिमेमुळे ५,००० कोटी रुपयांच्या सबसिडीची बचत होईल. त्याचा उपयोग गरिबांना एलपीजी कनेक्शन देण्यासाठी केला जात आहे’ असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.३०,००० कोटींची बचतसध्या ग्राहकांना वर्षाला १४.२ किलो वजनाचे १२ गॅस सिलिंडर्स किंवा ५ किलो वजनाचे ३४ सिलिंडर्स सबसिडीच्या दरात उपलब्ध करून दिले जातात. गॅस सिलिंडरवरील सबसिडी सोडल्यामुळे सरकारच्या सबसिडी बिलात बचत होईल.
गरिबांना मोफत गॅस कनेक्शन योजनेचा एक मे पासून प्रारंभ
By admin | Published: April 23, 2016 2:51 AM