शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

राज्य सरकारनेच अडविले शेतकर्‍यांचे सातशे कोटी रब्बीचे ७१३ कोटी तिजोरीत पडून : केंद्राने मदत देऊन महिना उलटला

By admin | Published: October 22, 2016 12:44 AM

अहमदनगर : रब्बी पिकांच्या नुकसानभरपाईपोटी केंद्राने दिलेले पंधराशे कोटी राज्य सरकारच्या तिजोरीत पडून आहेत़ महिना उलटूनही हा निधी जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत अद्यापही झिरपला नाही़ शेतकर्‍यांच्या नावाने गळा काढणार्‍या सरकारनेच शेतकर्‍यांचे सातशे कोटी अडविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ सरकारच्या या उदासीनतेबाबत जिल्‘ातील शेतकर्‍यांकडून नाराजी व्यक्त होत आहे़

अहमदनगर : रब्बी पिकांच्या नुकसानभरपाईपोटी केंद्राने दिलेले पंधराशे कोटी राज्य सरकारच्या तिजोरीत पडून आहेत़ महिना उलटूनही हा निधी जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत अद्यापही झिरपला नाही़ शेतकर्‍यांच्या नावाने गळा काढणार्‍या सरकारनेच शेतकर्‍यांचे सातशे कोटी अडविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ सरकारच्या या उदासीनतेबाबत जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून नाराजी व्यक्त होत आहे़पुरेसा पाऊस झाल्याने यंदा दुष्काळ हटला़ शेतकर्‍यांनी उधार उसणवारी करून पिके आणली़ पण, अतिवृष्टीने त्यावर नांगर फिरविण्याची वेळ आली़ शेतातून उत्पन्न दूरच़ पण केलेला खर्चही वसूल होऊ शकला नाही़ पाऊस पडूनही पैशांअभावी जिल्ह्यातील बळिराजा हवालदिल आहे़ अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना आर्थिक मदतीची गरज असते़ केंद्राने सरकारने रब्बीच्या दुष्काळ सहाय्यता निधीची घोषणा करून शेतकर्‍यांना एक प्रकारे धीर दिला़ सरकारने सन २०१५-१६ मधील रब्बीच्या नुकसानभरपाईपोटी राज्य सरकारला १ हजार ५०० कोटींची मदत दिली़ राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी अहमदनगर व सोलापूर जिल्हेच फक्त या मदतीस पात्र आहेत़ नगर जिल्हा प्रशासनाने ७१३ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविलेला आहे़ याचाच अर्थ केंद्राकडून मिळालेल्या १ हजार ५०० कोटीतून ७१३ कोटी एकट्या नगर जिल्ह्याला मिळणार आहेत़ परंतु सरकारच्या अनास्थेमुळे ही मदत राज्याच्या तिजोरीतच अडकली आहे़ किमान दिवाळीत तरी सरकार मेहरबान होईल़ रब्बीचे अनुदान खात्यावर जमा कधी होणार, अशी विचारणा शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात दूरध्वनीवरून करत आहेत़ अजून निधी वर्ग झाला नाही़ निधी आल्यानंतर देऊ, असे उत्तर प्रशासनाकडून शेतकर्‍यांना दिले जात आहे़ नगर जिल्ह्यातील ७ लाख हेक्टरवरील रब्बीचे पिके वाया गेली़ बाधित शेतकर्‍यांची ७ लाख ८२ हजार ३६ आहे़ जिल्हा प्रशासनाने ७१३ कोटींच्या मदतीचा प्रस्ताव सरकारला पाठविला होता़ त्यानुसारच केंद्राने हा निधीही दिला़ तसे वृत्तही वृत्तपत्रांतून झळकले़ त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या़ परंतु, राज्य सरकारकडून त्यावर अद्याप कोणतही कार्यवाही झाली नाही़ पुढील आठवड्यात जरी हा निधी मिळाला तरी शेतकर्‍यांना बँक खात्यावर तो जमा करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे़ परंतु सरकार ऐन दिवाळीत मेहरबान होणार की नाही, याबाबत साशंकता आहे़़़़़़़़़़़़़