नवी दिल्ली : केंद्र सरकारकडे ‘स्मार्ट गाव’ योजना सुरू करण्याची कोणतीही योजना नाही; मात्र राज्यांना अशा प्रकारचा उपक्रम राबवायचा असल्याने ते ‘स्मार्ट गाव’ योजना सुरू करू शकतात, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले.केंद्रीय राज्यमंत्री मनसुखभाई धांजीभाई वासवा यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. लोकसंख्यावाढ, लोकांचे शहराकडे स्थलांतर या समस्यांच्या पार्श्वभूमीवर शहरांचा डौल सांभाळण्यासाठी ‘स्मार्ट सिटी’ योजनेची गरज आहे. अशा योजनांमुळे जीवनाची गुणवत्ता वाढविण्यास मदत होते.