शहरात राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन
By admin | Published: September 04, 2015 10:45 PM
नागपूर : पद्मगंधा प्रतिष्ठान आणि साहित्य विहार या दोन संस्थाच्यावतीने १९ व २० डिसेंबर रोजी राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नागपुरात आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने सर्वांगीण विदर्भ विकासाचा शोध घेणारी स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. यात विदर्भाच्या ११ ही जिल्ांचा समावेश होणार असून याचे संपादन डॉ. प्रज्ञा आपटे करणार आहेत. ग्रंथदिंडी, ग्रंथपूजन, उद्घाटन, दोन परिसंवाद निमंत्रित आणि प्रतिनिधींचे दोन कविसंमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रकट मुलाखत, अभिरुप न्यायालय आदी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन संमेलनात करण्यात आले आहे. दोन महिलांनी उभारलेले हे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. यानिमित्ताने डॉ. श्रीधर शनवारे कविता स्पर्धा, कुसुमावती देशपांडे ललित लेख स्पर्धा, रमेश फाळके प्रवासवर्णन आणि एकांकिका स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. सं
नागपूर : पद्मगंधा प्रतिष्ठान आणि साहित्य विहार या दोन संस्थाच्यावतीने १९ व २० डिसेंबर रोजी राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नागपुरात आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने सर्वांगीण विदर्भ विकासाचा शोध घेणारी स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. यात विदर्भाच्या ११ ही जिल्ह्यांचा समावेश होणार असून याचे संपादन डॉ. प्रज्ञा आपटे करणार आहेत. ग्रंथदिंडी, ग्रंथपूजन, उद्घाटन, दोन परिसंवाद निमंत्रित आणि प्रतिनिधींचे दोन कविसंमेलने, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रकट मुलाखत, अभिरुप न्यायालय आदी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन संमेलनात करण्यात आले आहे. दोन महिलांनी उभारलेले हे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. यानिमित्ताने डॉ. श्रीधर शनवारे कविता स्पर्धा, कुसुमावती देशपांडे ललित लेख स्पर्धा, रमेश फाळके प्रवासवर्णन आणि एकांकिका स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. संमेलनासाठी सदस्य नोंदणी सुरू असून इच्छुकांनी शुभांगी भडभडे, आशा पांडे, वर्षा किडे-कुळकर्णी, स्मृती देशपांडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.