सुपरव्होटला पाठविली राज्य सुपरव्होट
By admin | Published: January 31, 2017 2:06 AM
उद्धव ठाकरे :मुख्यमंत्र्यांवर पलटवार
उद्धव ठाकरे :मुख्यमंत्र्यांवर पलटवारमुंबई : शिवसेना आणि भाजपा यांच्यातील युती संपुष्टात आल्यानंतर अपेक्षेप्रमाणे दोन्ही पक्षांत शाब्दिक कलगीतुरे रंगू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारच्या भाजपा मेळाव्यात शिवसेनेवर जोरदार प्रहार केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय प्रतिउत्तर काय देतात याबाबत उत्सुकता होती. उद्धव यांनी मात्र, फार काही बोलणार नाही, नाहीतर घसा बसेल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित आंबेरकर यांच्यासह उल्हासनगर येथील विद्यमान नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले. या पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणावर काहीही बोलयाचे नाही, असे उद्धव यांनी सांगितले. भाजपाला काय टीका करायची ती करु द्या, आपण आपले काम घेऊन लोकांपुढे जाऊ, असे शिवसैनिकांना सांगितले आहे. आम्ही आमची मुंबई घडवल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.मुख्यमंत्र्यांची एक प्रतिमा होती, मात्र ती आता मलिन झाली आहे. आता ते गुंडाचे मंत्री आहेत का असा प्रश्न पडतो. मी मांडलेल्या पारदर्शकतेच्या मुद्यावर कोणीच बोलत नाही, आता अच्छे दिनबद्दलही कोणी बोलताना दिसत नाही. भाजपा मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घसा बसला होता. त्यावर, फार काही बोलणार नाही, नाहीतर माझा घसा बसेल अशी भीती वाटते, अशी कोपरखळी उद्धव यांनी मारली. यावेळी उद्धव यांनी मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनाही लक्ष्य केले. लाल किल्ल्यावर भाषण केले म्हणून कोणी पंतप्रधान होत नाही. तसे स्वत:ला कृष्ण म्हणवून कोण कृष्ण बनत नाही किंवा स्वत:ला पांडव म्हटल्याने पांडव होता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. आशिष शेलार यांनी शिवसेनेची तुलना कौरवांशी, उद्धव यांची दुर्योधनाशी तर भाजपाची पांडवांशी अप्रत्यक्ष तुलना केली होती. त्यावर कालचा सारा प्रकार कोकणातील दशावतार असावा असे वाटते, अशा शब्दात उद्धव यांनी भाजपाच्या मेळाव्याची खिल्ली उडवली. केंद्रात सत्ता आल्यापासून अयोध्येत राम मंदिर बनेल असे भाजपाला वाटते. कदाचित हरवलेल्या विटा त्यांना सापडत असतील, त्यामुळे राम मंदिर बांधायला सुरुवात होईल, असा टोलाही उद्धव यांनी लगावला. आता सगळ्यांचे मुखवटे उतरले आहेत आणि खरे चेहरे समोर आले आहेत, असे सांगतानाच मुंबई-ठाणेकरांना दिलेली वचने पाळणार असल्याचे आश्वासनही उद्धव यांनी दिले. (प्रतिनिधी)निरुमम यांचे भाजपाशी संधान, काँग्रेस संपवण्याचा डाव- आंबेरकर महापालिका निवडणुकीच्या तोडंावर मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते आणि देवेंद्र आंबेरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. देवेंद्र आंबेरकर हे ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे कर समर्थक मानले जातात. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या हुकूमशाही कारभारामुळे काँगेसला सोडचिठ्ठी दिल्याचे आंबेरकर यांनी सांगितले. यावेळी उल्हासनगर येथील विद्यमान नगरसेवक मीना सोंडे , पुष्पा बागुल, किशोरी बनवारी आणि विजय पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. निरुपम यांच्यामुळे मुंबईतील मराठी माणूस काँग्रेसपासून दुरावत आहे. संपूर्ण पक्ष संपवण्याची तयारी निरुपम यांनी चालविली आहे. भाजपाशी संधान साधून पद्धतशीरपणे मराठी नेत्यांना बाजूला करण्याचे उद्योग निरुपम यांनी चालविल्याचा आरोप आंबेरकर यांनी केला. निरुपम यांच्याकडून कामत गटाला बाजूला सारले जात असल्याने सध्या पक्षात अस्वस्थता आहे. त्यामुळे कामत गटातील नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना आणि भाजपात डेरेदाखल होण्याचा सपाटा लावला आहे. मुंबई काँग्रेमधील वाद मिटविण्यासाठी ज्येष्ठ काँग्रेस नेते भुपिंदर हुड्डा यांनी अलीकडेच मुंबई दौरा केला होता. यावेळी वाद मिटविण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्याला पुरेसे यश आले नसल्याचे चित्र आहे. अभिनेते धर्मेंद्र यांनी स्वत: भुपिंदर हुड्डा यांना फोन करुन मला तिकीट देऊ नका, असे सांगितले होते. भाजपाला हाताशी धरुन काँग्रेसच्या चांगल्या उमेदवारांना तिकीट न देण्याचे कट-कारस्थान निरुपम यांना रचल्याचा आरोपही आंबेरकरांनी केला.यापुर्वी काँग्रेसच्या कामत गटातील स्थायी समितीच्या सदस्या वकारुन्नीसा अन्सारी यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्या एमआयएममध्ये जाणार असून त्यांना एमआयएमकडून प्रभाग क्रमांक २२३ मधून उमेदवारीही देण्यात आली आहे. निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमधील या गळतीने पक्षात चिंतेचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)