राज्य-थोडक्यात-नागपूर
By admin | Published: February 21, 2015 12:50 AM
राज्य-थोडक्यात-नागपूर
राज्य-थोडक्यात-नागपूरटीव्हीवरील अश्लीलता थांबविण्यासाठी यंत्रणानागपूर : टीव्ही वाहिन्यांवर अश्लील कार्यक्रम व जाहिराती प्रसारित होऊ नयेत यासाठी यंत्रणा तयार करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती केंद्र शासनातर्फे हायकोर्टात देण्यात आली आहे. संबंधित जनहित याचिकेवर ४ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. ॲड. प्रवीण डहाट असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. टीव्ही वाहिन्यांवर अश्लील व द्विअर्थी भाषेचे कार्यक्रम सर्रास दाखविले जात आहेत. चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी सेंसर बोर्डाचे प्रमाणपत्र आवश्यक असते.मधुचंद्राच्या वाटेवर नववधूचा दुर्दैवी अंतनागपूर : लग्नानंतर सिमला येथे मधुचंद्रासाठी जाणाऱ्या छोटी धंतोली येथील नवदाम्पत्याची कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात नववधू जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री ९.३० वाजता घडली. लग्नाला दहा दिवसही उलटले नसताना ही घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राहुल निंबर्ते (२४) आणि ऋचा माटे (२०) रा. छोटी धंतोली यांचे ९ फेब्रुवारी २०१५ रोजी सेंट्रल बाजार रोडवरील गणेश लॉन बजाजनगर येथे विवाह झाला. लग्नानंतर ते मधुचंद्रासाठी सिमला येथे जात होते. नागपूरवरून विमानाने ते दिल्लीला गेले. तेथून ते इनोव्हा कारने सिमल्याला जात होते. सिमल्याला जाण्यापूर्वी दोन किलोमीटरपूर्वी त्यांची इनोव्हा कार दरीत कोसळली.स्वाईन फ्लूने तरुणाचा मृत्यू नागपूर : जिल्ह्यात स्वाईन फ्लूची दहशत कायम आहे. बुधवारी रात्री पुन्हा एका तरुणाचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, गुरुवारी एकही रुग्ण पॉझिटीव्ह किंवा मृत्यू झाल्याची शासकीय यंत्रणेकडे नांेद नसल्याची माहिती आहे. गंगाधर रामकृष्ण घोडमारे (३२) रा. हिंगणा (संगम) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगाधर हा गेल्या २० दिवसांपासून आजारी होता. नागपूरच्या एका खासगी इस्पितळात उपचार सुरू होते. तिथे स्वाईन फ्लूचे लक्षण दिसताच त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले. मागील आठ दिवसांपासून तो व्हेंटिलेटरवर होता. (प्रतिनिधी)