‘एसपीजी’विषयीचे वक्तव्य निराधार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 04:48 AM2018-09-25T04:48:37+5:302018-09-25T04:48:53+5:30
रा. स्व. संघाच्या पसंतीच्या व्यक्तींना नेमण्यास नकार दिल्याने ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’च्या एका माजी संचालकास मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर लगेचच राजीनामा द्यावा लागला होता, हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेले विधान निराधार
नवी दिल्ली : रा. स्व. संघाच्या पसंतीच्या व्यक्तींना नेमण्यास नकार दिल्याने ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप’च्या एका माजी संचालकास मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर लगेचच राजीनामा द्यावा लागला होता, हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेले विधान निराधार असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी स्पष्ट केले.
सरकारच्या महत्त्वाच्या संस्था रा. स्व. संघ कशा काबीज करीत आहे, हे सांगताना राहुल गांधी म्हणाले होते की, नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यावर गुजरातमधील एका अधिकाऱ्याची ‘एसपीजी’च्या प्रमुखपदी निवड झाली; परंतु संघाने निवडलेल्या अधिकाºयांना नेमण्यास नकार दिल्याने पद सोडावे लागले, असे या अधिकाºयाने आपल्याला सांगितले.
‘ते’ तसे बोलले नाहीत
गृहमंत्रालयाने असेही म्हटले की, राहुल गांधी यांच्या विधानाच्या अनुषंगाने ‘एसपीजी’चे माजी संचालक विवेक श्रीवास्तव यांच्याकडेही विचारणा केली असता त्यांनी आपण असे विधान कधीही केले नसल्याचे सांगितले.