हरीश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अनेक राज्ये कोरोना विषाणूमुळे होणाºया मृत्यूंचे आकडे लपवत असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आता संपूर्ण भारतात या जीवितहानीवर लक्ष ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली या राज्यांच्या तुलनेत काही राज्ये मृत्यू कमी दिसावेत कमी लोकांच्या चाचण्या घेत आहेत. देशात गुजरात हे एकमेव राज्य असे असावे की, त्याने कोविड-१९ च्या चाचणीसाठी रुग्णालयात दाखल करणे अनिवार्य केले आहे. दिल्ली राज्यानेही चाचणीच्या पद्धतीत बदल केला आहे. दिल्लीचे म्हणणे असे की, आम्ही कोविड पॉझिटिव्हच्या सहवासात उघडपणे लक्षणे नसलेले लोक आले तरी त्यांच्या चाचण्या करणार नाही.
पश्चिम बंगालने ७२ जणांच्या मृत्यूचा समावेश कोविडने झालेल्या मृत्यूच्या यादीत समावेश केला नाही. कारण ते अनेक आजारांचे रुग्ण होते व ही बाब आयसीएमआरच्या निकषाविरुद्ध होती. देशात दर दहा लाख लोकसंख्येमागे सरासरी चाचण्या ३०७४ होत असताना १५ राज्ये अशी आहेत की त्यांच्या चाचण्यांची संख्या या सरासरीपेक्षाही कमी असल्याचे समोर आले आाहे.
भारतात मृत्यूचा दर कमी का दाखवला जात आहे याबाबत पंतप्रधानांच्या टास्क फोर्सच्या सदस्यांनीही खुलासा मागवल्यावर आयसीएमआरने शेवटी कारवाईची तत्परता दाखवली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या मंगळवारी ठामपणे सांगितले की, देशात मृत्यूचा आकडा हा फारच कमी दाखवला असे नाही आणि भारताचा मृत्यू दर हा जगात सगळ््यात कमी २.८० टक्के आहे.आयसीएमआरने आता रुग्णालयाबाहेरही कोविड-१९ मुळे लोकांचे प्राण जात आहेत का हे बघण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीएमआर मृत्यूची संख्या कमी सांगण्यात काही असाधारण घडले का याचे मूळात जाऊन विश्लेषण करणार आहे. कोविड-१९ च्या रुग्णांना सुविधेअभावी दाखल करून घेतले जात नाही, चाचण्या केल्या जात नाहीत, ते घरीच विलगीकरणात (क्वारंटाईन) राहतात आणि जर त्यांच्यापैकी कोणाचा मृत्यू झाल्यास तो कोविड-१९ मुळे झाला असे मोजले जात नाही. ही बाब या सगळ््या घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या संस्थाच्या लक्षात आली आहे.
मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अगदी जवळच्या नातेवाईकांनाही हा मृत्यू कोविड-१९ मुळे झाला, अशी नोंद व्हावी नको होते.मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्यास संबंध कोरोनाशी जोडला जाऊ शकतोच्आयसीएमआरचे देखरेखीचे काम कोविड-१९ महामारी जेवढे दिवस असेल तेवढे चालेल आणि देशाच्या महानिबंधकांच्या आरोग्य आणि लोकसंख्याशास्त्रविषयक व्यवस्था आणि मृत्यू सांख्यिकी विभाग मृत्यूची जी साप्ताहिक आकडेवारी गोळा करीत आहे त्याचा अभ्यासही आयसीएमआर करणार आहे.च्परिषद याशिवाय यावर्षी मरण पावलेल्यांची माहिती मिळवून तिची तुलना मागच्या वर्षींच्या माहितीशी करणार आहे. त्या माहितीची तुलना मार्च ते मे या कालावधीसाठी केली जाईल आणि सत्य मिळवण्यासाठी रोजच्यारोज माहिती घेतली जाईल.2018मध्ये भारतात सामान्यत: २७ हजार मृत्यू रोज झाले होते. मृत्यूच्या सामान्य संख्येत जर कोणत्याही कारणाने वाढ झाल्यास त्याचा संबंध कोविड-१९ शी जोडला जाऊ शकतो. त्याची चौकशी होईल, असे आयसीएमआरच्या अधिकाºयाने म्हटले.