कोरोना : देशातील 14 राज्यांत आढळले तब्बल 116 रुग्ण, अशी आहे राज्यवार आकडेवारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 12:13 PM2020-03-16T12:13:30+5:302020-03-16T12:36:28+5:30

सोमवारपर्यंत देशभरात 116 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात 17 परदेशी नागरिगांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे देशात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 

statewise corona suspected cases in india, till now 111 suspects found in India | कोरोना : देशातील 14 राज्यांत आढळले तब्बल 116 रुग्ण, अशी आहे राज्यवार आकडेवारी 

कोरोना : देशातील 14 राज्यांत आढळले तब्बल 116 रुग्ण, अशी आहे राज्यवार आकडेवारी 

Next
ठळक मुद्दे17 परदेशी नागरिगांचा समावेश आहेएआयआयएमएसने जारी केला हेल्पलाइन क्रमांकआतापर्यंत इराण, इटली आणि चीनमधून भारतीय नागरिकांची सुटका 

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा धोका जगाबरोबरच देशातही वाढला आहे. सोमवारपर्यंत देशभरात 116 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात 17 परदेशी नागरिगांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे देशात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोनासंदर्भात केंद्र सरकार आणि संर्व राज्य सरकारांकडूनही जनजागृती केली जात आहे. एवढेच नाही, तर कोरोनाचा प्रसार होऊनये यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालये, आणि मॉल्सदेखील बंद करण्यात आले आहेत. कोरोनाच्या भीतीने अनेक ठिकाणचे सार्वजनिक कार्यक्रमही पुढे ढकलण्यात येत असल्याचे दिसत आहे. 

जगभरात अनेक देशांमध्ये भारतीय नागरिक कोरोनाच्या सावटाखाली अडकलेले आहेत. या नागरिकांना भारत सरकार देशात आनत आहे. आतापर्यंत इराण, इटली आणि चीनमधून भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.

एआयआयएमएसने जारी केला हेल्पलाइन नंबर -

कोरोनासंदर्भातील माहिती घेण्यासाठी अथवा देण्यासाठी +91-11-23978046 या हेल्पलाइन नंबरवर फोन करता येऊ शकतो. तसेच एआयआयएमएसने (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) 9971876591 हा 24/7 हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. या शिवाय प्रत्येक राज्यानेही आपापला हेल्पलाइन नंबर जारी केला आहे.

कोरोनाग्रस्तांची राज्यवार आकडेवारी अशी -

  • दिल्ली - 7
  • हरियाणा - 14
  • केरळ - 22
  • राजस्थान - 4
  • तेलंगणा - 3
  • उत्तर प्रदेश - 13
  • लद्दाख - 3
  • तमिळनाडू - 1
  • जम्मू-काश्मीर - 2
  • पंजाब - 1
  • कर्नाटक - 6
  • महाराष्ट्र - 32
  • आंध्र प्रदेश - 1
  • उत्तराखंड - 1 
  • ओडिशा - 1 
  • एकूण - 116

 

Web Title: statewise corona suspected cases in india, till now 111 suspects found in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.