तामिळनाडू : ब्राम्हणांविरोधातील द्राविडी चळवळीचे प्रणेते पेरियार यांच्या चेन्नईतील पुतळ्यावर अज्ञातांनी चप्पल ठेवल्याचे आढळून आले. तसेच त्यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे समोर आले आहे.
याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चौकसी सुरु केली आहे. ही घटना चेन्नईमदील तिरप्पूरमध्ये घडली.
इरोडे वेंकटप्पा रामास्वामी असे त्यांचे नाव असून ते पेरियार या नावाने ओळखले जात. त्यांनी काँग्रेसमधून फारकत घेत ब्राम्हणविरोधी चळवळ उभी केली होती. या चळवळीला द्रविड कझागम असे ओळखले जाते. यानंतर अन्नादुराई यांनी डीएमके पक्षाची स्थापना केली.यापूर्वीही मार्चमध्ये पेरियार यांच्या पुतळ्याचे मुंडके उडविण्यात आले होते.