नवी दिल्ली- ऐक्याचे प्रतीक (स्टॅच्यू ऑफ युनिटी) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील 182 मीटर उंचीच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण झाले आहे. या समारंभाला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच अनेक नेते उपस्थित आहेत. या पुतळ्याचे काम 2013साली मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सुरू झाले होते, ते आता पूर्ण झाले आहे. या पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला आहे.
लॉर्सन अॅन्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचालित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती. 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा जगातील सर्वात उंच पुतळा असून तो कमी वेळेत तयार करण्यात आला आहे. पुतळ्याची उंची ही न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट आहे. तसेच चीनमधील गौतम बुद्धांच्या स्प्रिंग टेंपल येथील पुतळ्यापेक्षाही उंच आहे.
लोखंड आणि तांबे यांच्या मिश्रणातून पुतळा तयार करण्यात आला आहे. 18,500 टन रेनफोर्स स्टील, 6,500 टन स्ट्रक्चरल स्टील, 1,700 टन आणि अनेक धातूंचा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' साठी वापर करण्यात आला आहे. भूकंप अथवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे नुकसान होणार नाही अशापद्धतीने संरचना करण्यात आली आहे. तसेच पुतळा तयार करण्यासाठी तब्बल दोन कोटी 25 लाख किलो सिमेंटचा वापर करण्यात आला आहे.Statue Of Unity Updates
- देशातील काही लोक आमची ही मोहीम राजकारणाशी जोडू पाहतात तेव्हा आश्चर्य वाटतं. सरदार पटेल यांच्यासारख्या महापुरुषांचं कौतुक केल्यावरही आमच्यावर टीका केली जाते, महापुरुषांचं कौतुक करणं हा मोठा गुन्हा आहे काय? :