वडोदरा : ‘लोहपुरुष’ अशी ओळख असलेले भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा अतिभव्य पुतळा नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणाच्या परिसरात उभारण्याचे काम युद्धपातळीवर आहे. येत्या ३१ आॅक्टोबरला सरदार पटेल यांच्या १४३ व्या जयंतीदिनी त्याचे अनावरण केले जाऊ शकेल, असा विश्वास गुजरात सरकारने व्यक्त केला आहे.गुजरातचे मुख्य सचिव जे. एन. सिंग यांनी केवडिया कॉलनीला भेट देत कामाचा आढावा घेतला. काम ठरल्याप्रमाणे ३१ आॅक्टोबरपूर्वी पूर्ण होईल, अशी खात्री त्यांनी व्यक्ते केली. सरदार सरोवर नर्मदा निगमचा प्रमुख या नात्याने हे महत्त्वाकांक्षी काम पूर्ण होताना पाहून आपल्याला विशेष आनंद होत असल्याचे सिंग म्हणाले.पुतळ््याच्या मुख्य कामाचे अनावरण झाल्यानंतर काही महिन्यांतच हा रोप-वेही सुरू होईल, असे सिंग म्हणाले. ते म्हणाले की, धरण बांधकामा वेळी सामान व कर्मचाºयांच्या वाहतुकीसाठी उभारलेला एक रोप-वे सध्या आहे. त्याचाच विस्तारत केला जाईल. या रोप-वेने जाताना पर्यटकांना एका बाजूला सरदार पटेलांचा गगनचुंबी पुतळा तर दुसºया बाजूला नर्मदा नदीचे अथांग पात्र दिसणार आहे.येथून सुमारे १०० कि.मी. अंतरावर असलेल्या नर्मदा नदीवरील सरकार सरोवर धरणापासून नदीपात्रात ३.५ कि.मी. आत साधू बेटावर हा पुतळा उभारला जात आहे. सरदार पटेल यांनी ५६२ संस्थाने खालसा करून देशाच्या एकात्मततेत मोठे योगदान दिले म्हणून या पुतळ््याचे ‘स्टॅच्यु आॅफ युनिटी’ असे नामाभिधान करण्यात आले आहे. पूर्ण झाल्यावर हा पुतळा न्यूयॉर्क येथील जगप्रसिद्ध ‘स्टॅच्यु आॅफ लिबर्टी’हून उंच होईल व तो जगातील सर्वात उत्तुंग पुतळा ठरेल. सुमारे ३,००० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प म्हणजे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांच्या हस्ते ३१ आॅक्टोबर २०१३ रोजी या कामाचे भूमिपूजन झाले होते. तो दिवस सरदार पटेल यांच्या १३८व्या जयंतीचा होता. हे काम सरकार व खासगी उद्योगांच्या भागीदारीत (पीपीपी) केले जात असून सरदार सरोवर नर्मदा निमग लि., लार्सन अॅण्ड ट्युब्रो हे त्यातील दोन भागीदार आहेत. (वृत्तसंस्था)काँक्रीट आणिपोलादाचे बांधकामअन्य पारंपरिक पुतळ््यांप्रमाणे हा पुतळा दगडात कोरून किंवा धातूचे ओतीव काम करून केलेला नसेल. एखादी इमारत बांधतात तसे सरदार पटेल यांच्या देहयष्टीच्या आकाराचे ते काँक्रीट व पोलादाचे बांधकाम असेल.मानवी शरीराच्या आकाराचे हे बांधकाम बाहेरून ब्रॉन्झची पॅनेल्स लावून आच्छादले जाईल. बॉन्झची ही पॅनेल्स बनविण्याचे कामही प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांच्या देखरेखीखाली जागेवर सुरु आहेत. आत्तापर्यंत पुतळ््याचे १५७ मीटर उंचीपर्यंतचे (समुद्रसपाटीपासून १९२ मीटर) काँक्रीट व पोलादाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.
‘स्टॅच्यु आॅफ युनिटी’चे ३१ आॅक्टोबरला अनावरण, मोदींच्या स्वप्नातील सरदार पटेलांचे स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 1:23 AM