खांबांच्या आड राहून मोबाईल चोरी
By admin | Published: August 26, 2015 11:32 PM
खांबांच्या आड राहून मोबाईल चोरी
खांबांच्या आड राहून मोबाईल चोरीलोकल प्रवासात दरवाजाजवळ उभे राहणार्या प्रवाशांना धोकामध्य रेल्वे आरपीएफकडून २७ धोकादायक ठिकाणाची यादी तयारमुंबई - लोकलच्या दरवाजाजवळ उभे राहून मोबाईलवर बोलणार्या प्रवाशांनो सावधान. लोकल प्रवासात ट्रॅकवर उभे राहून चोरांकडून मोबाईल चोरीची नवी शक्कल लढवली जात आहे. प्रवासात दरवाजाजवळ उभे राहणार्या प्रवाशाच्या हातावर दंडुक्याने फटका मारुन मोबाईल चोरले जात असून अशा धोकादायक ठिकाणांची मध्य रेल्वे आरपीएफकडून यादीच तयार करण्यात आली आहे. यात चोरांकडून ट्रॅकवरील खाबांची आधार घेण्यात येत असून अशा प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी आरपीएफकडून व्यूहरचना आखण्यात आली आहे. मध्य रेल्वेची मेन लाईन आणि हार्बरवरुन प्रवास करताना अनेक प्रवासी लोकलच्या दरवाजाजवळ उभे असतात. यात काही प्रवासी मोबाईलवर बोलत दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करतात. अशा प्रवाशांना हेरुन चोरांकडून दंडुक्याच्या सहाय्याने फटका मारुन मोबाईल चोरी केली जात आहे. यात मोबाईल ट्रॅकवर पडल्यानंतर चोर मोबाईल लंपास करतात. अशा घटनां मोठ्या प्रमाणात निदर्शनास येत असून त्याला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे आरपीएफने व्यूहरचना आखली आहे. या प्रकारे होणार्या चोर्यांच्या ठिकाणांचे ब्लॅक स्पॉट तयार करण्यात आले आहेत. मध्य रेल्वे मेन लाईन आणि हार्बरवर असे २७ धोकादायक ठिकाणे असल्याचे आरपीएफकडून सांगण्यात आले. कल्याण स्थानकाजवळ सहा, डोंबिवलीजवळ दोन, नाहूर-मुलुंडजवळ आठ, पनवेलजवळ एक, तुर्भेजवळ सात आणि ठाणे स्थानकाजवळ तीन धोकादायक ठिकाणे आहेत. या ठिकाणी आरपीएफकडून पाळत ठेवण्यात आली असून अशी २0 गुन्हे उघडकीस आली आहेत. यात अटक करण्यात आलेल्यांमध्ये १७ ते ३0 वयोगटातील आरोपींचा समावेश आहे. त्यांच्यावर याआधीही बरेच गुन्हे असल्याचे सांगण्यात आले. ........................................मोबाईलची स्वस्तात विक्रीमोबाईल चोरल्यानंतर त्याची स्वस्तात विक्री चोरांकडून केली जाते. एखादया मोबाईल शॉपला विकतानाच मोबाईलचे फॅड असणार्या विद्यार्थ्यांनाही ते विकले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. .............................आरोपींकडून चैन चोरीच्याही घटनापकडलेल्या आरोपींकडून चैन चोरीच्याही घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ..................................सचिन भालोदे (मध्य रेल्वे- वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त)- या घटना बर्याच निदर्शनास आल्या आहेत. त्याविरोधात कारवाई केली जात आहे. अशी ब्लॅक स्पॉटची यादीच तयार करण्यात आली असून रेल्वे पोलिसांकडून त्यावर करडी नजर ठेवण्यात येत आहे.