धक्कादायक ! पोटातून निघाला स्टिलचा ग्लास, नातेवाईकांसोबत डॉक्टरही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 10:51 AM2017-11-30T10:51:15+5:302017-11-30T11:05:23+5:30

मध्यप्रदेशातील सतना येथे एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. एका 55 वर्षीय व्यक्तीच्या पोटातून स्टीलचा ग्लास बाहेर काढण्यात आला असून, यामुळे नातेवाईकांसोबत डॉक्टरांनीही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Steel glass found from the stomach of patient | धक्कादायक ! पोटातून निघाला स्टिलचा ग्लास, नातेवाईकांसोबत डॉक्टरही हैराण

धक्कादायक ! पोटातून निघाला स्टिलचा ग्लास, नातेवाईकांसोबत डॉक्टरही हैराण

Next
ठळक मुद्देऑपरेशन करुन 55 वर्षीय व्यक्तीच्या पोटातून स्टीलचा ग्लास बाहेर काढण्यात आला पोटदुखीचा त्रास होत असल्याने सार्थक रुग्णालयात या व्यक्तीवर ऑपरेशन करण्यात आलंरुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे

सतना - मध्य प्रदेशातील सतना येथे एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. एका 55 वर्षीय व्यक्तीच्या पोटातून स्टीलचा ग्लास बाहेर काढण्यात आला असून, यामुळे नातेवाईकांसोबत डॉक्टरांनीही आश्चर्याचा धक्का बसला आहे. पोटदुखीचा त्रास होत असल्याने सार्थक रुग्णालयात या व्यक्तीवर ऑपरेशन करण्यात आलं. यावेळी त्याच्या पोटात स्टिलचा ग्लास असेल याची डॉक्टरांनी कल्पनाही नव्हती. एक्स-रे काढला असता पोटात स्टिलचा ग्लास असल्याचं समोर आलं, आणि डॉक्टरांचीही त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना. अखेर ऑपरेशन करुन ग्लास बाहेर काढण्यात आला. 

'रुग्णाला पोटदुखीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. एक्स-रे काढला असता पोटाच ग्लास असल्याचं समोर आलं. मात्र हा ग्लास त्यांच्या पोटात पोहोचला कसा हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही', अशी माहिती डॉक्टर सार्थक अग्रवाल यांनी दिली आहे. दरम्यान डॉक्टरांनी रुग्णाला हा ग्लास तुमच्या पोटात कसा गेला असं विचारण्याचा प्रयत्न केला. पण रुग्ण काही स्पष्टपणे सांगू शकला नाही. 

पोटातील ग्लास बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना ऑपरेशन करावं लागलं. यासाठी विशेष काळजी घेणंही गरजेचं होतं. डॉक्टरांनी यशस्वीपणे ऑपरेशन करुन ग्लास बाहेर काढला असून, रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. 

रुग्णाच्या पोटातून काढले 5 किलो लोखंड, काचा, ब्लेड्स, साखळी, 263 नाणी
मध्य प्रदेशातील एका शस्त्रक्रियेने डॉक्टरांचे डोळेच पांढरे व्हायची वेळ आली. या शस्त्रक्रियेत रुग्णाच्या पोटातून दाढी करायच्या ब्लेडची पाती, काचा, साखळी, असे 5 किलो वजनाचे लोखंड काढण्यात आले आहे. 

मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील सोहोवाल गावातील 32 वर्षांच्या महंमद मकसूद नावाच्या रुग्णाच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या. त्यामुळे त्याला शेजारच्या रेवा जिल्ह्यात उपचारासाठी पाठवण्यात आले. रेवा जिल्ह्यातील संजय गांधी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे त्याला तपासणीसाठी आणल्यावर डॉक्टर प्रियांक शर्मा यांनी त्याच्या तपासणी केली व एक्स-रे काढले. त्यानंतर डॉ. शर्मा यांच्यासह सहा डॉक्टरांच्या चमूने त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेत सापडलेल्या वस्तू पाहून डॉक्टरही चक्रावून गेले.या रुग्णाच्या पोटात 263 नाणी, काचा, दाढीची ब्लेड्स, साखळी असे पाच किलो 'साहित्य' सापडले.

डॉ. शर्मा यांच्या मते या रुग्णाची मानसिक स्थिती नीट नव्हती, या वस्तू त्याने कुणाचेही लक्ष नसताना गुपचूप गिळंकृत केल्या आहेत. रेवाला आणण्यापूर्वी त्याच्यावर सतना येथे सहा महिने उपचार झाले होते पण तेथे त्याच्या प्रकृतीला आराम मिळाला नव्हता. यापूर्वीही अशा वस्तू गिळण्याच्या घटना घडल्या आहेत. इंदोरमध्ये महाराजा यशवंतराव रुग्णालयात झालेल्या एका शस्त्रक्रियेत एका 25 वर्षाच्या लेच्या पोटातून दीड किलो वजनाचा केसाचा गोळा काढला होता. ही शस्त्रक्रिया काही तास चालली होती. तर कोलकात्यात एका रुग्णाच्या पोटातून 639 नखे काढली गेली होती. या नखांचे वजन 1  किलो होते. या 48 वर्षांच्या रुग्णाला स्किझोफ्रेनिया( छिन्नमनस्कता) हा आजार झाला होता.

Web Title: Steel glass found from the stomach of patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.