लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : खरीप हंगामातील २०२३-२४ च्या विपणन हंगामासाठी आज केंद्रातील मोदी सरकारने सर्व अनिवार्य पिकांच्या हमीभावात (किमान आधारभूत किंमत) घसघशीत वाढीचा निर्णय जाहीर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जास्त हमीभाव देण्याच्या सरकारच्या आश्वासनानुसार दर जाहीर केले असून, गेल्या अनेक वर्षांमधील ही सर्वाधिक वाढ असल्याचा दावा केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांनी केला. चार वर्षांमध्ये प्रतिकूल स्थितीचा सामना करावा लागूनही २०२२-२३ मध्ये देशात एकूण विक्रमी ३३०.५ दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन झाले. ही वाढ १४.९ दशलक्ष टनांची असून, पाच वर्षांतील सर्वाधिक वाढ आहे, असे गोयल यांनी सांगितले.
खरीप हंगामातील पीके
२०२३-२४ नवे हमी भाव दिलेली वाढ
कापूस (मध्यम धागा) ₹६६२० ₹५४०कापूस (लांब धागा) ₹७०२० ₹६४०सोयाबीन (पिवळा) ₹४६०० ₹३००तूर ₹७००० ₹४००रागी ₹३८४६ ₹२६८ज्वारी संकरित ₹३१८० ₹२१०ज्वारी मालदंडी ₹३२२५ ₹२३५नाचणी ₹३८४६ ₹२६८बाजरी ₹२५०० ₹१५०धान सामान्य ₹२१८३ ₹१४३धान अ श्रेणी ₹२२०३ ₹१४३मका ₹२०९० ₹१२८उडद ₹६९५० ₹३५०मूग ₹८५५८ ₹८०३तीळ ₹८६३५ ₹८०५भुईमूग ₹६३७७ ₹५२७सूर्यफूल बिया ₹६७६० ₹३६०कारळे ₹७७३४ ₹४४७(किमान आधारभूत किंमत)