उत्तराखंडच्या बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ मजुरांपर्यंत पाईप टाकण्यात आला आहे. एनडीआरएफ देखील त्यांच्या पर्यंत पोहोचली आहे, परंतू अद्याप त्यांना बाहेर काढण्यात आलेले नाहीय. उत्तराखंडचे मुख्यमंत्री देखील सिलक्यारा टनेलमधून जायला निघाले आहेत. १७ दिवसांच्या प्रयत्नांनंतर मजुरांपर्यंत मार्ग बनला तरी त्यांना बाहेर का काढले जात नाहीय असा प्रश्न करोडो भारतीयांना पडू लागला आहे.
एनडीएमएच्या सदस्यांनीही एका मजुराला बाहेर येण्यासाठी ३ ते ४ मिनिटे लागणार असल्याचे सांगितले होते. तसेच सर्व मजुरांना बाहेर काढण्यास तीन साडेतीन तास लागणार असल्याचे सांगितले होते. परंतू, त्यांच्यापर्यंत मार्ग काढूनही या मजुरांना आणखी एक रात्र वाट पहावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. एनडीएमएचे सदस्य लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन (निवृत्त) यांनी हे रेस्क्यू ऑपरेशन संपण्यास आणखी एक रात्र लागेल असे सांगितले आहे.
रॅट मायनिंग कसे केले...हे काम 3 टप्प्यात केले जात होते. एक माणूस खणायचा, दुसरा ती माती गोळा करायचा आणि तिसरा बाहेर काढायचा. अत्यंत कष्टाच्या आणि जोखमीच्या या कामात धोका कमी करण्यासाठी अनेक व्यवस्था करण्यात आल्या होत्या. या कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ नये म्हणून ऑक्सिजनसाठी ब्लोअर बसविण्यात आले होते. अखेर ही टेक्निक यशस्वी ठरली.