मुंबई : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत पराभूत करणे हे आमचे मुख्य ध्येय्य असून त्याकरिता आम्ही वेगळा मार्ग धरला असला तरी शिवसेनेबाबत आमच्या मनात मैत्रीचीच भावना राहील, अशी स्पष्टोक्ती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली.शिवसेनेबरोबर कटुता येऊ नये याकरिता निवडणुकीच्या दरम्यान आम्ही कुठलीही टीका करणार नाही. कुणी टीका केली म्हणून त्याला उत्तर देण्याचे कारण नाही. कारण आमचे ध्येय्य काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र हे आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. गोपीनाथ मुंडे यांच्यावर विश्वास ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी व शिवसंग्राम हे पक्ष महायुतीत आले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांना सोबत ठेवावे अशी आमची भूमिका होती. मात्र शिवसेनेकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या प्रस्तावात कधी आमच्या तर कधी घटकपक्षाच्या जागा कमी होत होत्या. विशिष्ट अंकाभोवती महायुतीच्या जागावाटपाची चर्चा फिरत होती. त्यामुळे घटकपक्षांना वाऱ्यावर सोडून जाणे बरोबर नाही असे आमचे मत पडल्याचे फडणवीस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
...तरीही आमच्यात अजूनही मैत्रीचीच भावना
By admin | Published: September 26, 2014 3:25 AM