ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - रेल्वेची आर्थिक घडी संभाळत प्रवासी सुविधांवर भर देणारा रेल्वे अर्थसंकल्प रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केला आहे. मात्र प्रभूंच्या या अर्थसंकल्पवार शेअर बाजारातून नकारात्मक प्रतिक्रिया उमटली आहे.
प्रभूंनी रेल्वेच्या भांडवली खर्चामध्ये २१ टक्के वाढ करण्याची घोषणा करुनही बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली. सेन्सेक्स २३ हजारच्या जवळ आणि निफ्टी ७ हजारच्या खाली आला आहे. रेल्वे जाळयामध्ये भारतीय रेल्वे जगात चौथ्या स्थानावर आहे.
रेल्वेचा भांडवली खर्च २१ टक्के म्हणजे १.२१ लाख कोटीपर्यंत वाढवण्यात आला आहे. अर्थसंकल्पानंतर रेल्वे क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. बीईएमएल, केरनेक्स मायक्रोसिस्टीम, टीटागड वॅगन्स आणि कालिंदी रेल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली.